मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुंबईत कोरोना धोका वाढला या उच्चभ्रू भागामुळे; पब्जमुळे वाढली संख्या, पुढे आली धक्कादायक आकडेवारी

मुंबईत कोरोना धोका वाढला या उच्चभ्रू भागामुळे; पब्जमुळे वाढली संख्या, पुढे आली धक्कादायक आकडेवारी

Mumbai Covid-19 latest: मुंबईत कोरोनाची वाढती रुग्णसंख्या (Corona hotspots in Mumbai) उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या उपनगरात आहे. या लोकवस्तीतून नियम पाळण्यासाठी सहकार्य मिळत नाही, अशी कर्मचाऱ्यांची तक्रार आहे. पाहा समोर आलेली धक्कादायक आकडेवारी

Mumbai Covid-19 latest: मुंबईत कोरोनाची वाढती रुग्णसंख्या (Corona hotspots in Mumbai) उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या उपनगरात आहे. या लोकवस्तीतून नियम पाळण्यासाठी सहकार्य मिळत नाही, अशी कर्मचाऱ्यांची तक्रार आहे. पाहा समोर आलेली धक्कादायक आकडेवारी

Mumbai Covid-19 latest: मुंबईत कोरोनाची वाढती रुग्णसंख्या (Corona hotspots in Mumbai) उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या उपनगरात आहे. या लोकवस्तीतून नियम पाळण्यासाठी सहकार्य मिळत नाही, अशी कर्मचाऱ्यांची तक्रार आहे. पाहा समोर आलेली धक्कादायक आकडेवारी

पुढे वाचा ...

मुंबई, 8 मार्च : दोन महिन्यांपूर्वी चांगली आटोक्यात आली असं वाटत असलेली कोरोनाची (Covid-19 Mumbai latest updates) साथ पुन्हा एकदा जोमाने फोफावत आहे.  राज्यातल्या इतर जिल्ह्यासारखंच मुंबईतही कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. मुंबईतल्या कोरोनाच्या हॉटस्पॉटची आकडेवारी (Coronavirus hotspots in mumbai) बघितली तर लक्षात येतं की मुंबई उपनगरातील अंधेरी पश्चिम हा सगळ्यात बाधित आणि सगळ्यात जास्त रुग्ण वाढीचा दर असलेला वॉर्ड आहे. अंधेरीतल्या अनेक उच्चभ्रू वस्त्यांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढते आहे. यामुळेच शहराची Covid-19 ची आकडेवारी धक्कादायक पातळीवर पोहोचली आहे.

अंधेरी भागात रुग्णवाढीचा दर सर्वाधिक आहे. दररोज सरासरी 92 नवे कोरोना रुग्ण या उपनगरात सापडत आहेत. उच्चभ्रू  लोखंडवालामधील रहेजा क्लासिक या इमारतीत महापालिकेच्या नोंदीनुसार, सध्या 11 जण कोरोनाचे रुग्ण आहेत. तरीही इथले दैनंदिन व्यवहार, ये-जा सुरळीत सुरू असल्याचं दिसतं. वास्तविक मुंबई महापालिकेच्या कोविड नियमानुसार इमारतीत पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळल्यास ती सील करण्यात येते. पण या इमारतीत असं झालेलं दिसत नाही.

तीच गोष्ट  जुहु चौपाटीची. चौपाटीवरही लोकांची गर्दी आहे. मास्क न घालता वावरणारे अनेक जण इथे दिसतात. इथे येणारे नागरिक अनेकदा दंड भरण्याऐवजी क्लीन अप मार्शलनाच ओरडतात, असाही अनुभव इथले कर्मचारी सांगतात. अंधेरी भागात असणाऱ्या हॉटेल्स, पब्समध्ये सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जात नाहीत. इथली गर्दीसुद्धा कोरोनाचा फैलाव वाढवायला कारणीभूत ठरणारी आहे.

रुग्णवाढीचा भयावह दर

अंधेरी पश्चिम याचा दर आठवड्याचा रुग्ण वाढीचा दर हा 0.42 %इतका आहे. मागच्या आठवडाभरात जवळपास साडे सहाशे करोना रुग्णांची वाढ या वॉर्डात नोंदवण्यात आली आहे.  याचा अर्थ दर दिवसाला सरासरी 92 नवे करोनाबाधितांची नोंद या वॉर्डात झाली आहे. 27 फेब्रुवारी च्या आकडेवारीनुसार आतापर्यंत एकूण 21 हजार 660 इतकी रुग्ण संख्या या वॉर्डात होती. जी 6 मार्च आकडेवारीनुसार 22,302 झाली आहे.  28 फेब्रुवारीला 87नवे करोनारुग्ण बाधित झाले, जे वाढून  तीन मार्चला 96 चार मार्चला 107 तर 5 मार्चला 119 आणि सहा मार्चला 97 इतकी मोठ्या प्रमाणात वाढली.

अंधेरी पश्चिम येथील सध्या 30 इमारती पण सील केल्या गेल्या आहेत. इमारती सील करण्याच्या पद्धतीत मागच्या काही दिवसात बदल करण्यात आला आहे. पाच पेक्षा अधिक रुग्ण जर त्या इमारतीत सापडले तर त्या इमारतीला सील केलं जातं किंवा पाचपेक्षा कमी रुग्ण सापडले तर त्या इमारतीचा तो बाधित रुग्ण सापडलेला फक्त मजला सील केला जातो.

या वॉर्डाचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांच्या मते 'इथे हॉटेल्स आणि पबची संख्या जास्त आहे. लोकांचं साशालायझिंग जास्त आहे.  यामुळे कोरोनाचा प्रसार वाढतोय. सध्या उच्चभ्रू वस्तीत कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. मोटे यांनी सांगितलं, "जसं झोपडपट्टी किंवा चाळींमध्ये लोकांचं सहकार्य मिळालं तसं सहकार्य या टोलेजंग इमारतीत अनेकदा मिळत नाही. आम्ही 11 सेंटर्सवर मोफत  कोरोना चाचण्या सुरू केल्या आहेत. RTPCR  सोय असली तरी लोक तिथपर्यंत पोहोचतच नाहीत. आम्ही मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई मोठ्या प्रामाणात सुरू केली आहे. 7 मार्चला एका दिवसात साडतीन हजार लोकांकडून साडे सहालाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. पण कोरोनासारख्या आजाराशी दोन हात करायचे असतील तर लोकांच्या सहकार्याशिवाय हे शक्य नाही."

बांद्र्यातही कहर

अंधेरी पश्चिम पाठोपाठ मुंबईतील करोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे तो एच पश्चिम  म्हणजेच बांद्रा पश्चिम हा वॉर्ड. जिथे सध्या रुग्ण वाढीचा दर हा 0.41 टक्के इतका आहे.   त्या नंतर एफ उत्तर म्हणजेच माटुंगा तिसर्‍या क्रमांकावर आहे.  तर रुग्णवाढीबाबत मुलुंड हा वॉर्ड चौथ्या क्रमांकावर, एम पश्चिम - चेंबूर पश्चिम हे पाचव्या तर चेंबूर ईस्ट हे या बाबतीत सहाव्या क्रमांकावर आहे.

वाचा- मास्क न घालणाऱ्यांवर रेल्वेची मोठी कारवाई, आतापर्यंत एवढा दंड वसूल

सध्या मुंबईत सगळ्यात रुग्ण वाढीचा दर कुठे कमी असेल तर तो आहे बी विभाग म्हणजे सँडहर्स्ट रोड त्याखालोखाल मरीन लाईन , तर जी  उत्तर म्हणजे दादर माहीम आणि धारावी हा पट्टा त्याचबरोबर त्या खालोखाल आहे भायखळा म्हणजेच ई वॉर्ड. खरं तर रुग्णवाढीचा दर कमी असलेले सध्याचे हे वॉर्ड कोरोनाच्या सुरवातीच्या काळात सर्वाधिक रुग्ण सापडणारे वॉर्ड होते. जिथे आता करोना बऱ्यापैकी नियंत्रणात आणला गेला आहे आणि म्हणूनच इथे करोना रुग्णवाढ  कमी आहे.

कंटेन्मेंट झोन किती?

मुंबईत  एकूण 18 कंटेनमेंट झोन आहेत.कंटेनमेंटझोन मध्ये चाळी आणि झोपडपट्टी यांचा समावेश होतो त्याचबरोबर सील असणाऱ्या इमारतीची संख्या 192 आहे. तर 5 पेक्षा कमी रुग्ण आढळले असल्याने मुंबईतील इमारती मधील  2450 मजले सील करण्यात आले आहेत.

मुंबईच्या एकूण आकडेवारीवर नजर टाकली म्हणजे कोरोनाच्या संसर्गाच्या सुरुवातीपासून  पाहिलं तर लक्षात येतं की आत्तापर्यंत तीन लाख 32 हजार 204 इतके रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत आणि पैकी  तीन लाख नऊ हजार 431 जणांना बरं करून घरी पाठवण्यात आलं.तर दुर्दैवानं मुंबईमध्ये अकरा हजार 495 इतक्या जणांचा मृत्यू झाला ज्यात मध्ये 50 वर्षांपेक्षा वय असणाऱ्या मुंबईकरांचा समावेश आहे आणि ज्यांची संख्या आहे 9954 इतकी. सध्या मुंबईमध्ये एकूण करून बाधित असणारे म्हणजे ऍक्टिव्ह रुग्ण 10,398 असून  यापैकी ज्यांची  प्रकृती स्थिर आहे आणि ज्यांच्यात कोणतीही लक्षणं नाहीत अशा 6294 रुग्णांचा समावेश आहे.  तर

ज्यांच्यात कोरोनाची लक्षण आहेत पण ज्यांची प्रकृती स्थिर आहे अशा मुंबईकरांची संख्या आहे 3709 आणि एकूण 395 मुंबईकर हे सध्या क्रिटिकल आहेत म्हणजे ते व्हेंटिलेटरवर आहेत व त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक आहे.

Corona Vaccine घेतल्यानंतर तीन नवे साइड इफेक्ट्स आले समोर; चिंतेची बाब आहे का?

मुंबई शहरामध्ये आत्तापर्यंत 34 लाख 16 हजार 771 इतक्या करोना च्या चाचण्या झालेले आहेत आणि पैकी 9.72 टक्के इतका दर हा रुग्ण बाधित होण्याचा आहेया सगळ्याला तोंड देण्यासाठी आवश्यक असतं तर ते आहे रुग्णालय आणि आरोग्यव्यवस्था. सध्या मुंबईतील एकूण बेडची संख्या आहेत ते 10 हजार 540 याच्यातील 4933 इतके बेड हे हे वापरात आहेत म्हणजेच त्यावर रुग्ण दाखल आहेत तर  8607 इतके बेड अजूनही रिकामे आहेत. मुंबईतील एकूण वेंटीलेटर बेडची संख्या  947 आहे. पैकी 488 बेड  वर रुग्ण उपचार घेत असून 459 इतके वेंटीलेटर ची सुविधा  असलेले बेड याजूनही रिकामे आहेत.

First published:

Tags: Andheri, Coronavirus, Mumbai