जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / पती अन् त्याच्या मैत्रिणीचा FB वर विकृत उद्योग; छळाला कंटाळून पुण्यातील शिक्षिकेनं संपवलं जीवन

पती अन् त्याच्या मैत्रिणीचा FB वर विकृत उद्योग; छळाला कंटाळून पुण्यातील शिक्षिकेनं संपवलं जीवन

पती अन् त्याच्या मैत्रिणीचा FB वर विकृत उद्योग; छळाला कंटाळून पुण्यातील शिक्षिकेनं संपवलं जीवन

Suicide In Pune: पती आणि त्याच्या मैत्रिणीकडून सोशल मीडियावर केलेल्या विकृत उद्योगामुळे पुण्यातील एका शिक्षिकेनं गळफास घेऊन आत्महत्या (Female Teacher Commits Suicide) केल्याची घटना समोर आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 07 ऑगस्ट: पती आणि त्याच्या मैत्रिणीकडून सोशल मीडियावर केलेल्या विकृत उद्योगामुळे पुण्यातील एका शिक्षिकेनं गळफास घेऊन आत्महत्या (Female Teacher Commits Suicide) केल्याची घटना समोर आली आहे. आरोपी पती आणि त्याच्या मैत्रिणीनं फेसबुकवर मृत शिक्षिकेच्या नावानं बनावट खातं (FB Fake Account) काढून शिक्षिकेच्या मैत्रिणींसह नातेवाईकांना अश्लील मेसेज (Obscene Messages Sent to Relative) पाठवले होता. पती आणि तिच्या मैत्रिणीकडून होणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून शिक्षिकेनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिपाली नितीन गायकवाड असं आत्महत्या करणाऱ्या शिक्षिकेचं नाव असून त्या येरवडा परिसरातील लक्ष्मीनगर येथील रहिवासी होत्या. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी पती नितीन वसंत गायकवाड (वय-36) आणि रामनगर येथील रहिवासी असणारी पतीची मैत्रिणी रिया चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार मृत शिक्षिकेचे वडील मारुती यशवंत चव्हाण यांनी येरवडा पोलीस ठाण्यात दिली आहे. हेही वाचा- दारुच्या नशेत घेतला आईचा जीव, व्यसनाला विरोध करणाऱ्या 75 वर्षांच्या आईचा खून नेमकं प्रकरण काय आहे? मृत शिक्षिका दिपाली यांचा काही वर्षांपूर्वी नितिन गायकवाड याच्याशी विवाह झाला होता. सुरुवातीच्या काळात सर्वकाही ठिक सुरू होतं. दिपाली ह्या पुण्यातील एका खाजगी शाळेत शिक्षिकेची नोकरी करत होत्या. तर नितीन हा ठेकेदारीची कामं घेतं होतं. त्यांना दोन मुलीही आहे. पण मागील तीन वर्षांपासून  पीडितेला पती आणि नितीन आणि त्याची मैत्रिण रिया यांच्याकडून त्रास सुरू झाला. विविध कुरापती काढून काढून दोघं दिपाली यांचा मानसिक आणि शारिरीक छळ करत होता. हेही वाचा- ज्याच्यावर प्रेम केलं त्याचीच हत्या; पतीच्या मित्रासोबत जुळलं प्रेम आणि… दरम्यान आरोपींनी दिपाली यांच्या नावे फेसबुकवर बनावट खातं काढून त्यांच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना अश्लील मेसेज पाठवून बदनामी केली. हे प्रकरण केवळ एवढ्यावरचं थांबलं नाही, तर आरोपींकडून दिपाली यांना त्रास सुरूच राहिला. विविध कारणांवरून संशय घेत पतीकडून सातत्यानं शिवीगाळ केली जात होती. संबंधित आरोपींच्या त्रासाला कंटाळून पीडित शिक्षिकेनं 17 सप्टेंबर 2019 रोजी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हेही वाचा- प्रायव्हेट पार्ट आधी जळावा म्हणून चितेवर उलटा ठेवला चिमुरडीचा मृतदेह यानंतर मृत शिक्षिकेच्या वडिलांनी येरवडा पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी पती नितीन आणि त्याची मैत्रिण रिया विरोधात तक्रार दाखल केली होती. पण त्यानंतर कोरोना विषाणूचा संसर्ग सुरू झाल्यानंतर, फिर्यादीकडून तक्रारीबाबत कोणतीही भूमिका घेण्यात आली नाही. त्यानंतर आता कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर वडिलांनी पुन्हा एकदा येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात