मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /दारुच्या नशेत घेतला आईचा जीव, व्यसनाला विरोध करणाऱ्या 75 वर्षांच्या आईचा निर्घृण खून

दारुच्या नशेत घेतला आईचा जीव, व्यसनाला विरोध करणाऱ्या 75 वर्षांच्या आईचा निर्घृण खून

दारुच्या व्यसनावरून (Liquor adiction) सतत टीका करणाऱ्या आणि व्यसनापासून आपल्या मुलाला परावृत्त करू पाहणाऱ्या आईचा पोटच्या मुलानेच खून (Son murdered his mother) केला.

दारुच्या व्यसनावरून (Liquor adiction) सतत टीका करणाऱ्या आणि व्यसनापासून आपल्या मुलाला परावृत्त करू पाहणाऱ्या आईचा पोटच्या मुलानेच खून (Son murdered his mother) केला.

दारुच्या व्यसनावरून (Liquor adiction) सतत टीका करणाऱ्या आणि व्यसनापासून आपल्या मुलाला परावृत्त करू पाहणाऱ्या आईचा पोटच्या मुलानेच खून (Son murdered his mother) केला.

रायूपर, 6 ऑगस्ट : दारुच्या व्यसनावरून (Liquor adiction) सतत टीका करणाऱ्या आणि व्यसनापासून आपल्या मुलाला परावृत्त करू पाहणाऱ्या आईचा पोटच्या मुलानेच खून (Son murdered his mother) केला. दारु पिऊन आलेल्या मुलाला जाब विचारल्यानंतर राग सहन न झाल्याने मुलाने आईवर धारदार शस्त्रांनी वार करून तिचा खून केला.

अशी घडली घटना

छत्तीसगडमधील बलौदाबाजार गावात जोहनलाल नावाच्या इसमाला दारूचं व्यसन होतं. या विषयावरून त्याचे आणि त्याच्या आईचे सतत वाद होत असत. गुरुवारी रात्री दारूच्या नशेत घरी परतलेल्या जोहनलालला याच विषयावरून त्याच्या आईनं फैलावर घेतलं. त्यावर राग सहन न होऊन त्यानं धारदार शस्त्राने आईच्या पोटावर सपासप वार केले. त्यात धनकुंवर (वय 75) यांचा मृत्यू झाला. जोहनलाल आईवर वार करत असताना त्याची दोन्ही मुलं घरात नव्हती. मात्र जोहनलालची पत्नी सासूच्या किंकाळ्या ऐकून जागी झाली आणि धावत बाहेर आली. तिला पाहून जोहनलालने घरातून पळ काढला.

पोलिसांनी केली अटक

घरच्यांनी ही माहिती बिलाईगड पोलिसांना दिली. घरातून पळून गेलेला जोहनलाल गावातच लपून बसला होता. पोलिसांना त्यांच्या सूत्रांकडून ही माहिती समजल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून जोहनलालला अटक केली. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून कारवाई सुरु केली आहे.

हे वाचा -आई चितेवर असताना पतीची संभोगासाठी जबरदस्ती; खचलेल्या पत्नीने कोर्टात म्हणाली...

आईवडिलांच्या हत्येचं वाढतं प्रमाण

उत्तर भारतात आईवडिलांच्या हत्येचं प्रमाण वाढत चाललं आहे. विशेषतः दारु किंवा इतर व्यसनांच्या धुंदीत अनेक तरुण आपल्या वृद्ध आईवडिलांचा जीव घेत असल्याच्या घटना गेल्या काही दिवसांत सातत्याने समोर येत आहेत. चारच दिवसांपूर्वी आईनं धान्य साफ करायला नकार दिल्यामुळे एका तरुणानं तिचा खून केला होता.

First published:
top videos

    Tags: Chattisgarh, Murder news