मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /प्रायव्हेट पार्ट आधी जळावा म्हणून चितेवर उलटा ठेवला मृतदेह; 9 वर्षांच्या चिमुरडीचा भयावह अंत

प्रायव्हेट पार्ट आधी जळावा म्हणून चितेवर उलटा ठेवला मृतदेह; 9 वर्षांच्या चिमुरडीचा भयावह अंत

लहान मुलांवरील होत असलेल्या बलात्काराच्या घटनांविरोधात अनेक आंदोलने झाली. मात्र समाजात अजूनही अत्यंत घृणास्पद घटना घडत आहेत.

लहान मुलांवरील होत असलेल्या बलात्काराच्या घटनांविरोधात अनेक आंदोलने झाली. मात्र समाजात अजूनही अत्यंत घृणास्पद घटना घडत आहेत.

या प्रकरणात 55 वर्षीय पुजाऱ्यासह तिघांना अटक केली आहे.

नवी दिल्ली, 6 ऑगस्ट : बलात्काराच्या घटना या घृणास्पदच असतात. मात्र बलात्कारी किती टोकापर्यंत जाऊ शकतात याचा आपण विचारही करू शकत नाही. दिल्लीतील निर्भया घटनेने अनेकांच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. मात्र त्यानंतरही अशा घटना घडतच असल्याचं दिसत आहे. आता तर एका 9 वर्षांच्या चिमुरडीसोबत असा प्रकार घडला की जे पाहून तुम्हाला चीड येईल.

9 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार केल्यानंतर तिची हत्या करण्यात आली. 1 ऑगस्ट रोजी घडलेल्या घटनेनंतर आरोपींनी चिमुरडीचा मृतदेह जाळून टाकला. दलित कुटुंबाच्या मुलीसोबत घडलेला प्रकार समोर आल्यानंतर काँग्रेस नेता राहुल गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पीडित कुटुंबाला भेटून सात्वंन दिलं. या घटनेचा मुख्य आरोपी ओल्ड कँटच्या नांगल स्मशानाचा पुजारी आहे. पुजारीसह चार आरोपींना अटक करून तुरुंगात पाठविण्यात आलं आहे. मात्र मुलीला न्याय मिळावा यासाठी गावात आंदोलन पुकारण्यात आलं आहे.

हे ही वाचा-ज्याच्यावर प्रेम केलं त्याचीच हत्या; पतीच्या मित्रासोबत जुळलं प्रेम आणि...

घटनेच्या दिवशी काय झालं?

मृत चिमुरडीच्या आईने सांगितलं की, साडे पाच वाजेपर्यंत माझी मुलगी ठीक होती. तिचे वडील भाजी आणण्यासाठी गेले होते. मी बाहेरुन घरात आली होती. तेवढ्यात स्मशानातील पुजाऱ्याने घरी येऊन सांगितलं की, तुझ्या मुलीला शॉक लागला आणि तिचा जागेवरच मृत्यू झाला. चिमुरडी स्मशानात दररोज पाणी घेण्यासाठी जात होती. तिची आई धावत स्मशानात गेली तर तिच्या मुलीचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला जात होता. यानंतर चिमुरडीच्या आईने पंडित कडून मृतदेह मागितला. यावर तो म्हणाला की, तू भिकारी आहेस. तुझ्याकडे अंत्यसंस्कारासाठी पैसे कुठून येतील. पोलीस आली तर चिरफाड होईल. यानंतर तिच्या आईने सांगितलं की, तिचे डोळे बंद होते. केस खुले होते. नाकातून रक्त येत होतं. हातावर जखमेच्या खुणा होत्या. ओठ काळे पडले होते आणि बंद होते. तिने चितेवर पाणी टाकण्याचा प्रयत्न केला आणि मृतदेह बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला तर मला धक्का देण्यात आल्याचं महिलेने सांगितलं. चितेवर मुलीचा मृतदेह उलटा ठेवण्यात आला होता. जेणेकरून प्रायव्हेट पार्ट आधी जळावा.

यानंतर स्मशानाबाहेर जमा झालेली गर्दी टाळं तोडून आत आली. तोपर्यंत चिमुरडीचा मृतदेह अर्धा जळाला होता. पोलिसांनी तपास सुरू केला असून स्मशानातील एक खोली अस्ताव्यस्त अवस्थेत होती. चिमुरडीचा मृतदेह जळाला असल्यामुळे त्यातून कोणत्याही निकालापर्यंत जाणं कठीण आहे.

First published:
top videos

    Tags: Crime news, Delhi, Rape