जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / पिंपरीत महिला पोलिसाची आत्महत्या; नवरा परराज्यात ड्युटीवर असताना उचललं टोकाचं पाऊल

पिंपरीत महिला पोलिसाची आत्महत्या; नवरा परराज्यात ड्युटीवर असताना उचललं टोकाचं पाऊल

पिंपरीत महिला पोलिसाची आत्महत्या; नवरा परराज्यात ड्युटीवर असताना उचललं टोकाचं पाऊल

Female Police Suicide in Pimpari: पुणे शहर पोलीस दलाच्या विशेष शाखेत कार्यरत असणाऱ्या एका महिला पोलीस अधिकाऱ्यानं आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

पिंपरी, 05 जुलै: पुणे शहर पोलीस दलाच्या विशेष शाखेत कार्यरत असणाऱ्या एका महिला पोलीस अधिकाऱ्यानं आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या (Female police commits suicide) केल्याची घटना उघडकीस आली आहे. मागील दोन दिवसांपासून संबंधित महिला पोलिसाचा फोन बंद लागत होता. त्यामुळे एका मैत्रिणीनं या घटनेची माहिती पोलिसांना दिली. यानंतर आत्महत्येचं प्रकरण समोरो आलं आहे. त्यांनी मृत्यूपूर्वी कसल्याही प्रकारची सुसाइड नोट लिहिली नाही. त्यामुळे त्यांनी आत्महत्या नेमक्या कोणत्या कारणासाठी केली, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. वाकड पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. पुढारी नं दिलेल्या वृत्तानुसार, श्रध्दा शिवाजीराव जायभाये असं आत्महत्या करणाऱ्या 28 वर्षीय महिलेचं नाव आहे. त्या सध्या वाकड परिसरातील कावेरीनगर पोलीस लाईन याठिकाणी राहत होत्या. घरात कुणी नसताना त्यांनी गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. मृत पोलीस कर्मचारी विवाहित असून त्यांचे पती नेवीमध्ये नोकरीला आहेत. ते सध्या केरळमध्ये आपली देशसेवा बजावत आहेत. अशात श्रद्धा यांनी गळफास घेऊन स्वतः ला संपवलं आहे. हेही वाचा- कधी मारहाण तर कधी कापूर हातावर जाळून नरक यातना; बापानंच मुलीला दिली अघोरी शिक्षा वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार,  मागील दोन दिवसांपासून श्रध्दा यांचा मोबाईल फोन बंद लागत होता. त्यामुळे संशय बळावल्यानं त्यांच्या एका मैत्रीणीनं याबाबतची माहिती वाकड पोलिसांना दिली. यानंतर वाकड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तर घराचा दरवाजा आतून बंद असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. वाकड पोलिसांनी घराचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला असता श्रध्दा यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. हेही वाचा- सासऱ्यांचा मृतदेह नेताना जावयावर काळाचा घाला; एकाच दिवशी मायलेकी झाल्या विधवा पोलिसांनी घटनास्थळाची पहाणी केली असून घटनास्थळावरून कोणतीही सुसाइड नोट मिळाली नाही. त्यामुळं श्रद्धा यांच्या आत्महत्येचं नेमके कारण अद्याप कळू शकलं नाही. वाकड पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात