Home /News /maharashtra /

हृदयद्रावक! सासऱ्यांचा मृतदेह नेताना जावयावर काळाचा घाला; एकाच दिवशी मायलेकी झाल्या विधवा

हृदयद्रावक! सासऱ्यांचा मृतदेह नेताना जावयावर काळाचा घाला; एकाच दिवशी मायलेकी झाल्या विधवा

Death in Road Accident: चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील हिरापूर याठिकाणी एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. सासऱ्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी घेऊन जात असताना जावयावरही काळानं घाला घातला आहे.

    चंद्रपूर, 05 जुलै: चंद्रपूर जिल्ह्यातील हिरापूर याठिकाणी एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. सासऱ्यांचा (Father in law) मृतदेह शवविच्छेदनासाठी घेऊन जात असताना झालेल्या अपघातात (Road Accident) जावयाचाही मृत्यू (Son in law death) झाल्याची घटना समोर आली आहे. एकाच दिवशी सासरे आणि जावयाचा मृत्यू झाल्यानं मायलेकी विधवा (Widow) झाल्या आहेत. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञान वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपासाला सुरुवात केली आहे. हिरापूर येथील रहिवासी असणारे किसन चिडांम यांचा शनिवारी सायंकाळी शेतावर काम करताना अचानक मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. यानंतर पोलिसांनी मृत किसन चिडांम यांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. नातेवाईकांनी गावातील एक पिकअप वाहन भाड्यानं घेऊन किसन यांचा मृतदेह चिमूर याठिकाणी घेऊन जात होते. हेही वाचा-आधी दुचाकीला बांधून 400मीटर फरफटलं मग झाडाला बांधून..; तरुणाचा फिल्मी स्टाइल खून दरम्यान चिमूर कानपा महामार्गावरून जात असताना शंकरपूर याठिकाणी त्यांच्या वाहनाला एका अज्ञात ट्रकनं जोरदार धडक दिली. या अपघातात चालकासह वाहनातील सहा लोकं गंभीर जखमी झाले. स्थानिक लोकांनी त्यांना त्वरित ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण रविवारी पहाटे चारच्या सुमारास जावई शंकर गोमा खंडाते (वय-48) यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. हेही वाचा-शेतातून घरी परतणाऱ्या विवाहितेचं अपहरण; निर्मनुष्य ठिकाणी नेऊन घृणास्पद कृत्य तर वाहनातील अन्य जखमी रुग्णांना रविवारी सकाळी पुढील उपचारासाठी चंद्रपूर याठिकाणी हलवण्यात आलं आहे. एकाच दिवशी सासरे आणि जावयाचा मृत्यू झाल्यानं गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर दुहेरी आघातामुळे मायलेकीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Chandrapur, Death, Road accident

    पुढील बातम्या