मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

पुण्यात Remdesivir चा तुटवडा असूनही 31 रुग्णालयांची इंजेक्शन नेण्याकडेच पाठ, FDAनं मागितलं उत्तर

पुण्यात Remdesivir चा तुटवडा असूनही 31 रुग्णालयांची इंजेक्शन नेण्याकडेच पाठ, FDAनं मागितलं उत्तर

पुणे शहरासह ग्रामीण भागात ऑक्सिजन बेडचा आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. अशी एकंदरित परिस्थिती असताना पुण्यातील काही रुग्णालयांचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर आला आहे. जिल्ह्यातील 31 रुग्णालयांनी प्रशासनाने ठरवून दिलेला रेमडेसिवीर इंजेक्शनचा वाटा संकलन केला नाही.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

पुणे, 25 एप्रिल: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या (Coronavirus in Maharashtra) रुग्णांत मोठ्या संख्येनं वाढ  होतं आहे. पुणे शहरात आणि ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांत झपाट्यानं वाढ होतं आहे. त्यामुळे पुणे शहरासह ग्रामीण भागात ऑक्सिजन बेडचा आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. अशी एकंदरित परिस्थिती असताना पुण्यातील काही रुग्णालयांचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर आला आहे. जिल्ह्यातील 31 रुग्णालयांनी प्रशासनाने ठरवून दिलेला रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या (Remdesivir Injection) वाट्याचे संकलन केले नाही.

अशा रुग्णालयांना आता अन्न आणि जिल्हा प्रशासनाने (FDA) नोटीस बजावली असून लेखी उत्तराची मागणी केली आहे. संबंधित रुग्णालयांनी प्रशासनाने ठरवून दिलेले इंजेक्शन घेऊन न गेल्यानं 315 रेमडेसिवीर इंजेक्शन तसेच पडून राहिले आहेत. हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित 31 रुग्णालयांमध्ये जुन्नरमधील दोन रुग्णालयांसह महानगर पालिकेतील काही लहान रुग्णालयांचा समावेश आहे.

एफडीएने जारी केलेल्या पत्रावर सहाय्यक आयुक्त एस. व्ही. प्रतापवार यांची स्वाक्षरी आहे. या पत्राच्या माध्यमातून त्यांनी संबंधित सर्व रूग्णालयांना रेमडेसिव्हीरच्या साठ्याचं संकलन का केलं नाही, याबाबत लेखी उत्तर मागितलं आहे. या रुग्णालयांनी त्यांच्या वाटणीचा साठा संकलन न केल्यास संबंधित इंजेक्शन आवश्यकतेनुसार जवळच्या रुग्णालयात वितरीत केले जातील,  असेही या पत्रात म्हटलं आहे.

(हे वाचा-Sharad Pawar Health Update:शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मलिक यांची महत्वाची माहिती)

विशेष म्हणजे 16 एप्रिल रोजी जिल्हा अधिकाऱ्यांनी एक निवेदन जारी करत रेमडेसिवीरची थेट विक्री थांबवण्यासाठी कडक पावलं उचलली आहेत. थेट रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिवीरची विक्री करण्याऐवजी या इंजेक्शनचं वितरण संबंधित रुग्णालयांना करावं असं या निवेदनात म्हटलं होतं. त्याचबरोबर रुग्णालयातील बेडच्या क्षमतेनुसार रेमडेसिवीर इंजेक्शन राखीव  ठेवावेत असंही या निवेदनात म्हटलं होतं.

(हे वाचा-कोरोनाने घेतला संपूर्ण कुटुंबाचा घास; पुण्यातील कुचेकरांची हृदयद्रावक घटना)

संबंधित औषधांच संकलन करण्याबाबत आपल्याला FDA कडून कोणत्याही प्रकारचा संदेश अथवा पत्र मिळाला नसल्याची माहिती भोसरीतील साबळे रुग्णालयातील एका अधिकाऱ्यानं दिली आहे. त्यामुळे प्रशासन आणि रुग्णालयातील समन्वयावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं आहे.

First published:

Tags: Corona updates, Maharashtra, Mumbai, Pune, Pune cases