मुंबई, 25 एप्रिल: शरद पवार (Sharad Pawar) यांच्या तब्येतीबाबत महत्त्वाचं अपडेट समोर येत आहे. तोंडातील अल्सरसंदर्भात शरद पवार यांच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यांच्या तोंडातील अल्सर (Mouth Ulcer) काढण्यात आलाा असून त्यांची तब्येत एकदम ठणठणीत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी दिली आहे. पित्ताशयावर (Gallbladder Surgery) यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर शरद पवार रुग्णालयात तपासणीसाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या तोंडात एक अल्सर आढळला. तो काढण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. शरद पवार यांची तब्येत चांगली असून ते आता रुग्णालयात विश्रांती घेत आहेत. शिवाय देशभर पसरलेल्या कोरोनाच्या परिस्थितीचा (Coronavirus in Maharashtra) आढावा ते घेत आहेत. ते लवकरच आपले कामकाज पुन्हा सुरू करतील असा विश्वास नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे. मागील काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र तीन दिवसापूर्वी परत एकदा मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
Post Gall Bladder surgery of our president Sharad Pawar saheb, a follow up visit & check up at hospital revealed an ulcer in his mouth which has been removed.
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) April 25, 2021
He is well & resting in hospital.
Saheb is taking stock of the pandemic situation daily & will resume his activities soon
समाज माध्यमांमध्ये पवार यांच्या प्रकृतीविषयी वेगवेगळी चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी याबाबत अधिकृतरित्या माहिती देत ट्वीट करून देखील शरद पवारांच्या प्रकृतीविषयी महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर मोठं संकट आलं आहे, त्यात केंद्र सरकारबरोबर वारंवार संघर्ष सुरू आहे. अशा परिस्थितीत शरद पवार महत्त्वाची भूमिका निभावतील अशी अपेक्षा राष्ट्रवाादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना वाटते आहे. मात्र शरद पवार हे गेले काही दिवस हॉस्पिटलमध्ये दाखल असल्याने चिंता वाढली आहे.