मुंबई, 1 डिसेंबर : मुंबईकरांना भूक लागल्यावर पहिल्यांदा वडापावची आठवण होते. मुंबई आणि उपनगरात वेगवेगळ्या पद्धतीनं बनवलेला वडापाव खायला मिळतो. हा खाण्यासाठी मोठी गर्दी असते. या गर्दीमध्ये आपला वडापाव वेगळा असावा असा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. तो बनवण्यापासून ते त्यामध्ये मिळणाऱ्या चटणीपर्यंत ग्राहकांना वेगळं देण्याचा प्रयत्न विक्रेते करत असतात. वडापावच्या या गर्दीत ठाण्यात मिळणारा भट्टी वडापाव हटके ठरतोय. हा वडापाव एकदा खाल्ला की भूकच भागते, असा अनेकांचा अनुभव आहे.
कसा बनतो भट्टी वडापाव?
तंदूरसाठी लावली जाणारी शेगडी पेटवली जाते त्यावर तळलेला वडा भाजला जातो. त्यानंतर पावाला विशिष्ट चटणी लावून त्यावर गाजर, कोबी, सिमला मिर्ची, कांदा ठेवला जातो. त्यात भाजलेला वडा ठेवला जातो त्यावर मायोनीज, चटण्या, चिझ लावून पुन्हा तंदूरच्या भट्टी मध्ये वडापाव भाजला जातो आणि खाण्यासाठी प्लेटमध्ये शेझवान चटणी व मायोनीज सोबत वाढला जातो.
संपूर्ण मुंबई पालथी घातली तरी 'असा वडापाव' मिळणार नाही, पाहा Video
ठाण्यात राहणाऱ्या विना दाभोळकर यांनी 5 वर्षांपूर्वी वडापावचा ठेला सुरु केला होता. त्यानंतर ग्राहकांना काहीतरी नवीन पदार्थ द्यावा म्हणून त्यांनी चीज, मायोनीज सोबत वडापाव विकण्यास सुरुवात केली. 9 महिन्यांपूर्वी त्यांना अचानक कल्पना सुचली की तंदूरच्या भट्टीत वडापाव भाजून दिला तर! आणि नंतर विना यांनी भट्टी वडापाव विक्रीस सुरुवात केली.
किती रुपये आहे किंमत?
साधा वडापाव 15 रुपये तर तंदूर भट्टी वडापाव 40 रुपयांना विकला जातो. तंदूर भट्टी वडापावचे प्रकार 50 रुपयांपर्यंत मिळतात. हा वडापाव खाण्यासाठी लोकं गर्दी करतात. ऑर्डर प्रमाणे वडापाव बनवून दिला जातो. तसंच ऑर्डर ज्यांची आधी त्यांना लवकर वडापाव मिळतो.
विद्यार्थ्यांना फक्त 5 रुपयांमध्ये मिळतो वडापाव! विश्वास बसत नसेल तर पाहा Video
गुगल मॅपवरून साभार
अष्टविनायक भट्टी वडापाव असं या ठेल्याचं नाव आहे. ठाणे स्थानकाच्या पूर्व भागात 5 मिनिटं चालत गेले तर एका चौकातच अष्टविनायक भट्टी वडापाव अशी पाटी दिसते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18, Local18 food, Thane