पुणे, 10 नोव्हेंबर : पुणे तिथं खायला काहीही उणे नाही असं म्हणता येईल इतके वेगवेगळे पर्याय शहरात उपलब्ध आहेत. शहराच्या कोणत्याही भागात गेलात तर तिथं खाण्यासाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. वेगवेगळे पर्याय सहज उपलब्ध असल्यानं पुणेकर खाण्याच्या बाबतीत चांगलेच रसिक आहेत. इथं आज असलेला ट्रेन्ड उद्या कायम राहिल की नाही हे सांगता येत नाही. त्या परिस्थितीतही शहरातील एक समोसा गेल्या 30 वर्षांपासून पुणेकरांच्या मनात मानाचे स्थान पटकावून आहे. एका टोपलीत सुरूवात पुण्यामध्ये 30 वर्षांपूर्वी ज्ञान प्रबोधिनी समोर अनारसे यांनी टोपलीमध्ये समोसे विकायला सुरुवात केली होती. सध्या ते सदाशिव पेठ येथे त्यांच्या नवीन दुकात समोसे विकत आहे. त्यांच्या विशिष्ट चव आणि समोशाच्या कुरकुरीतपणा आंबट गोड चटणी यामुळे अगदी कमी कालावधीमध्ये हा समोसा पुणेकरांचा आवडीचा समोसा झाला. आम्ही 1993 साली ज्ञान प्रबोधिनी जवळ समोसे विकायला सुरुवात केली होती. एक टेबल आणि टोपली घेऊन मी त्यावेळेस समोसे विकायचो तेव्हापासून ते गेल्या 30 वर्षापासून आम्ही आमची विशिष्ट चव ही जपली आहे.आम्ही समोसे बनवण्याच्या पिठात तीन ते चार वेगळे पीठ एकत्र करून बनवतो. समोस्याच्या सारणासाठी लागणारे मसाले आम्ही घरीच बनवतो. तसेच बटाटे देखील आम्ही विशिष्ट प्रकारचे बटाटे हा समोसासाठी वापरतो. या समस्या सोबत मिळणारी चटणी ही आंबट गोड चवीच्या असून ह्या चटणीमुळे देखील समोशाला एक वेगळी च प्राप्त होते यामुळे हा समोसा तीस वर्षापासून पुण्यात प्रसिद्ध आहे. असे या समोस्याचे मालक संजय अनारसे यांनी सांगितले.
ग्राहकांचा ओढा कायम पुण्यातील धायरी भागात राहाणारे राहुल जगदाडे हे समोसा खाण्यासाठी 14 किलोमीटर प्रवास करून इथं आलो आहे. आम्ही शाळेत असल्यापासून इथं नियमित सामोसा खाण्यासाठी येतो, असे त्यांनी सांगितले. तर मुंबईच्या शब्दाली डांगे देखील या सामोस्याच्या प्रेमात आहेत. माझे पती शाळेत असताना हे समोसा खात असतं. मी आठवर्षांपूर्वी पुण्यात आले, त्यावेळी पहिल्यांदा इथं आले होते. त्यानंतर पुण्यात आल्यावर इथं नक्की येते असं डांगे यांनी सांगितलं.
गुजरातच्या टीमनं खाल्ली पुण्याची फेमस मिसळ, पाहा कसा होता अनुभव Video
गुगल मॅपवरून साभार
कुठे खाणार समोसा? अनारसे सामोसेवाले, नाथनाथ पार, कल्याणी हाईट्स, जैन मंदिराच्या समोर, सदाशित पेठ, पुणे - 411030 संपर्कासाठी क्रमांक - 097665 24095