मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

Pune : रस्त्यावर भिकारी दिसला तर करा 'इथं' संपर्क, त्याचं तातडीनं होईल पुनर्वसन

Pune : रस्त्यावर भिकारी दिसला तर करा 'इथं' संपर्क, त्याचं तातडीनं होईल पुनर्वसन

शहरातील भिकाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी केंद्र आहे हेच अनेकांना माहिती नसते.

शहरातील भिकाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी केंद्र आहे हेच अनेकांना माहिती नसते.

शहरातील भिकाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी केंद्र आहे हेच अनेकांना माहिती नसते.

  • Local18
  • Last Updated :
  • Pune, India

पुणे, 5 डिसेंबर : देशातील सर्वच शहरांमध्ये भिक्षेकरी नागरिकांची मोठी समस्या आहे. ही मंडळी रस्त्यामध्ये अडवून अनेकदा भीक मागतात. त्याचा अनेकांना त्रास होतो. पुणे शहर देखील त्याला अपवाद नाही. पुणे शहरातही भिक्षेकरींची मोठी संख्या आहे. या नागरिकांच्या मदतीसाठी असलेल्या केंद्रात भिक्षेकऱ्यांची संख्या अगदीच कमी असते. या प्रकारचे केंद्र आहे हेच अनेकांना माहित नाही. तर, हे केंद्र काय आहे? तिथं कुणाला दाखल करता येतं? त्या केंद्रात काय सुविधा आहेत? याची आपण माहिती घेऊ या

कोण आहेत भिक्षेकरी?

भिक्षेकऱ्यांमध्ये सार्वजनिक ठिकाणी भिक्षा मागणे, गाणे, नृत्य सादर करणे, भविष्य सांगणे किंवा  ढोंग करणे, कोणत्याही खासगी आवारात प्रवेश करून भीक मागणे, माणसाची अथवा प्राण्यांची कोणतीही जखम, इजा, विकृती आजारांचे प्रदर्शन करणे  या सर्व गोष्टींचा समावेश होतो. तुम्हाला रस्त्यावर कुणी भीक मागताना आढळल्यास त्या व्यक्तीचा फोटो काढून जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तो दाखवून कारवाईची मागणी तुम्ही करू शकतात.

भिक्षेकरी प्रतिबंध अधिनियम 1959 कलम 4 अन्वये भीक मागणे हा गुन्हा असून, त्यानुसार भिक्षेकऱ्यांवर पोलीस कारवाई करू शकतात. या प्रकाराची कारवाई केल्यानंतर त्यांना कोर्टापुढे हजर केले जाते. त्यानंतर कोर्टाकडून शिक्षा म्हणून त्यांची रवानगी भिक्षेकरी स्वीकार केंद्रात होते.

महापालिकेकडून मांजरींच्या नसबंदीचा धडाका, 2 महिन्यांची आकडेवारी उघड, Video

भिक्षेकऱ्यांच्या शिक्षेचा कालावधी कमीत कमी 1  ते जास्तीत जास्त 3 वर्षांचा असतो. काही अपवादात्मक परिस्थितीत ज्यांना आधार नाही अशा भिक्षेकऱ्यांना आजीवन या केंद्रात ठेवण्याची तरतूद आहे,' अशी माहिती  भिक्षेकरी स्वीकार केंद्राचे अधिक्षक संजय सांगळे यांनी दिली.

पुण्यातील परिस्थिती काय?

पुण्यातील भिक्षेकरी स्वीकार केंद्राला 100 पुरुष आणि 15 महिलांची मंजुरी आहे. तर 50 पुरुष आणि 5 महिलांना सामावून घेण्याची क्षमता या केंद्राची आहे. सध्या येथे 27  पुरुष आहेत. महिला केंद्राचे बांधकाम सुरू असल्याने त्यांना दुसरिकडं हलवण्यात आलं आहे.

भुयारी मार्ग बनला धोकादायक, दारूचे अड्डे आणि अंधाराचं सर्वत्र साम्राज्य

या केंद्रामध्ये भिक्षेकरांना झाडू बनविणे, कागदी प्लेट बनवणे यासारख्या लहान व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जाते. त्यांनी भविष्यात भीक न मागता स्वावलंबी बनावं, असा या केंद्राचा प्रयत्न आहे.

First published:

Tags: Local18, Pune