मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

Pune : भुयारी मार्ग बनला धोकादायक, दारूचे अड्डे आणि अंधाराचं सर्वत्र साम्राज्य

Pune : भुयारी मार्ग बनला धोकादायक, दारूचे अड्डे आणि अंधाराचं सर्वत्र साम्राज्य

X
पुण्यातील

पुण्यातील फुलेनगर पादचारी भुयारी मार्गाची दुरवस्था झाली आहे. या भुयारी मार्गाची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी प्रवासी करत आहेत.

पुण्यातील फुलेनगर पादचारी भुयारी मार्गाची दुरवस्था झाली आहे. या भुयारी मार्गाची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी प्रवासी करत आहेत.

  • Local18
  • Last Updated :
  • Pune (Poona) [Poona], India

पुणे 02 डिसेंबर : पादचाऱ्यांची सोय म्हणून पुणे महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून वर्दळीचे ठिकाण असलेल्या येरवडा येथील आळंदी रोडला फुलेनगर येथे पादचारी भुयारी मार्ग बांधला. पण सध्या या मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. या भुयारी मार्गातून प्रवाश्यांना रस्ता पार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. त्यामुळे या भुयारी मार्गाची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी प्रवासी प्रशानाकडे करत आहेत.

फुलेनगर येथील भुयारी मार्गामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे. बहुतांश ठिकाणी कचरा, दारूचे अड्डे, अंधाराचे साम्राज्य, चेंबर फुटले असल्यामुळे साठलेले पाणी, यामुळे भुयारी मार्गात दुर्गंधी निर्माण झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास होत आहे. हा एकमेव असा भुयारी मार्ग आहे जिथून  बीआरटी स्थानकावर जायचा रस्ता आहे. यामुळे बीआरटी स्थानकावर जाणाऱ्या प्रवाश्यांना स्वतःचा जीव मुठीत धरून जावं लागत आहे.

Kolhapur : कचऱ्याचा प्रश्न पेटला! प्रशासन का नागरिक पाहा कोण आहे कारणीभूत?,video

दिवसाढवळ्या या मार्गातून जाणे अशक्य

दिवसाढवळ्या देखील या मार्गातून जाणे अशक्य असते. एक तर इथे चेंबर फुटले असून त्याची दुर्गंधी सहन करावी लागते. हा दारुड्यांचा अड्डा असून येथे दिवसाढवळ्या देखील अंधार असतो. आणि हा एकमेव भुयारी मार्ग संपूर्ण रस्त्याच्या दोन किलोमीटरमध्ये असल्यामुळे आम्हाला रस्ता पार करणे देखील अवघड जाते आहे. त्यामुळे या मार्गाची प्रशासनाने दुरुस्ती करावी अशी आमची मागणी आहे, असं प्रवासी सोनाली गर्ग यांनी सांगितले.

 लवकरात लवकर दुरुस्ती करून ही समस्या सोडू

याबाबत महानगरपालिकेशी संपर्क साधला असतात त्यांनी या समस्येकडे लक्ष देऊन लवकरात लवकर आम्ही या मार्गाची दुरुस्ती करून ही समस्या सोडू असे सांगितले.

First published:

Tags: Local18, Pune