पुणे, 18 सप्टेंबर : संगीताची लहरी आनंद निर्माण करतात. त्यातून बासरीसारख्या वाद्यातून उमटणारे सुमधूर सूर तर ऐकणाऱ्याला गुंतवून ठेवतातच. पुण्यातल्या एक तरुण बासरीवादक तरुणीचा व्हिडिओ म्हणूनच सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय होत असावा. पलक जैन या कलाकार तरुणीचा एक VIDEO सध्या Facebook सेन्सेशन म्हणावा एवढा Viral झाला आहे.
'तेरे मेरे होटोंपे मीठे मीठे गीत मितवा' हे लता मंगेशकरांनी गायलेलं सदाबहार गाणं पलकने बासरीतून उमटवलं आहे. समुद्राच्या लाटांच्या पार्श्वभूमीवर पलकच्या बासरीतून उमटणारे सूर बेभान करणारे आहेत. म्हणूनच कदाचित ऐकणाऱ्या अनेकांनी हा व्हिडिओ facebook वर शेअरही केला आहे. हे मूळ गाणं चांदनी चित्रपटातलं आहे आणि याला संगीत दिलंय ज्येष्ठ संगीतकार शिव-हरी या जोडीने. पंडित शिवकुमार शर्मा आणि पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या जोडीने संगीत दिलेल्या मोजक्या चित्रपट गीतांपैकी हे एक.
हे पाहा - Made In China चा ट्रेलर रिलीज, पोट सुटलेल्या अवस्थेत दिसला राजकुमार राव
अर्थातच मूळ गाण्यात जागतिक कीर्तीचे बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरासिया यांनीच स्वतः बासरीचे सूर लावले आहेत. तेच सूर आता नव्या पिढीची बासरीवादक पलक जैन बासरीतून उमटवते आहे.
पलक जैन आणि तिचे वडील सचिन जैन दोघेही बासरीवादक आहेत. सचिन जैन हेच पलकचे गुरू आहेत. सचिन जैन व्यवसायाने चार्टर्ड अकाउंट असून एका मोठ्या कंपनीत नोकरी करतात. ते सॅक्सोफोन हे वाद्यही वाजवतात.
हे वाचा - रानू मंडल यांच्या दुसऱ्या गाण्याचा रिलीजपूर्वी सोशल मीडियावर 'जाळ अन् धुरळा'
पलकचा हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ तब्बल 87 हजार लोकांनी शेअर केलाय आणि 58 लाख 56 हजार लोकांनी पाहिला आहे. स्केल चेंजर तबला नावाच्या फेसबुक पेजवर हा पोस्ट करण्यात आला आहे.
-------------------------------------------------------------------------------------
धक्कादायक! शाळेनं प्रवेश नाकारला, कारण दिलं - पहिलीतला विद्यार्थी मारतोय डोळा
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा