Made In China चा ट्रेलर रिलीज, पोट सुटलेल्या अवस्थेत दिसला राजकुमार राव

Made In China चा ट्रेलर रिलीज, पोट सुटलेल्या अवस्थेत दिसला राजकुमार राव

राजकुमार रावचा मेड इन चायना या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. यामध्ये त्याचं पोट सुटलेलं दिसत आहे.

  • Share this:

मुंबई, 18 सप्टेंबर : राजकुमार रावचा मेड इन चायना या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. या सिनेमात राजकुमार राव अहमदाबादचा एका लहान व्यावसायिक रघु मेहता याच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला असून त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. याआधी राजकुमारनं या सिनेमातील लुक शेअर केला होता. ज्यात तो खूपच वेगळ्या अवतारात दिसत आहे. या अवातारात त्याला ओळखणंही कठीण झालं आहे. या सिनेमासाठी राजकुमारनं आपलं वजन वाढवल्यांचं लक्षात येतं. यामध्ये त्याचं पोट सुटलेलं दिसत आहे.

राजकुमार राव त्याच्या भूमिकेत नेहमीच समरस होऊन जातो. मेड इन चायनामध्ये राजकुमार सध्या ज्या वेशात दिसत आहे तसा तो याआधी कधीच दिसला नव्हता. या सिनेमाच दिग्दर्शन मिखिल मुसाले यांनी केलं आहे. या सिनेमात राजकुमार रावसोबत मौनी रॉय स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. हा सिनेमा 25 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.

अगं बाई अरेच्चा! 'ही' तर 'कतरिना कैफ'ची कार्बन कॉपीच, सलमान खानदेखील फसेल

मौनी रॉयच्या करिअरच्या दृष्टीकोनातून ही तिच्यासाठी सर्वात चांगली संधी आहे. याआधी ती अक्षय कुमार सोबत 'गोल्ड' सिनेमात दिसली होती. गोल्डनंतर मौनीचा हा दुसरा सिनेमा आहे. याशिवाय तिचं नाव नवाजुद्दीन सिद्दीकीच्या 'बोले चूडिया'शी जोडलं गेलं होतं मात्र नंतर यातून तिचं नाव वगळण्यात आलं.

'आरे मेट्रो' समर्थनार्थ ट्वीट करून बिग बी फसले, जलसाबाहेर मुंबईकरांची निदर्शनं

=====================================================

अपघातात फोटो काढणाऱ्या तरुणाला बोनटवर घेऊन पळाला आरोपी, पाहा VIRAL VIDEO

Published by: Megha Jethe
First published: September 18, 2019, 2:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading