Home /News /pune /

आधी विश्वासात घेतलं मग करायला लावलं भलतंच; FB वरील मैत्रिणीनं पुण्यातील तरुणाचा केला गेम

आधी विश्वासात घेतलं मग करायला लावलं भलतंच; FB वरील मैत्रिणीनं पुण्यातील तरुणाचा केला गेम

अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीने साडेपाच लाखांना गंडा घातला आहे. (File Photo)

अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीने साडेपाच लाखांना गंडा घातला आहे. (File Photo)

पुण्यातून (Pune) आणखी एक फसवणुकीची घटना उघडकीस आली आहे. आरोपी तरुणीनं अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी (threat to viral obscene video) देत फिर्यादीकडून तब्बल साडेपाच लाखांना गंडा (Ransom 5.54 lakh) घातला आहे.

    पुणे, 16 सप्टेंबर: सोशल मीडियावर मैत्री करून विश्वास संपादन करायचा, मग अश्लील कृत्य करायला लावून ब्लॅकमेल करत पैसे उकळायचे, असे अनेक गुन्हे यापूर्वी उघडकीस आले आहेत. वारंवार सायबर पोलिसांकडून सतर्क राहाण्याचं आवाहन करूनही अनेक जण सायबर चोरट्यांच्या जाळ्यात अडकत आहेत. अशात पुण्यातून (Pune) आणखी एक फसवणुकीची घटना उघडकीस आली आहे. आरोपी तरुणीनं अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी (threat to viral obscene video) देत फिर्यादीकडून तब्बल साडेपाच लाखांना गंडा (Ransom 5.54 lakh) घातला आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत. पुण्यातील धानोरी येथील रहिवासी असणाऱ्या 35 वर्षीय व्यक्तीची काही दिवसांपूर्वी फेसबुकवर झिनत शर्मा नावाच्या एका तरुणीशी मैत्री झाली होती. काही दिवस बातचित झाल्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. एकेदिवशी अचानक झिनतने फिर्यादीला फेसबुक मेसेंजरद्वारे कॉल केला. यावेळी संबंधित तरुणी नग्न अवस्थेत होती. तिने काहीवेळ नग्न अवस्थेत चाळे केल्यानंतर फिर्यादीलाही तसं करण्यास भाग पाडलं. हेही वाचा-विधवेसोबत सेक्स करताना केलं डिस्टर्ब; भूकेनं व्याकूळ आजीला निर्दयीपणे संपवलं फिर्यादीही संबंधित तरुणीच्या बोलण्याला भुलून तोही कॅमेऱ्यासमोर नग्न झाला. दरम्यान आरोपी तरुणीनं संबंधित सर्व प्रकार स्क्रीन रेकॉर्डरद्वारे आपल्या मोबाइलमध्ये सेव्ह केला. त्यानंतर संबंधित व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत, आरोपी तरुणीने पैशाची मागणी केली. तरुणीच्या दबावाला बळी पडत बदनामीच्या भीतीनं फिर्यादीनं आरोपी तरुणीच्या दोन बँक खात्यात तब्बल 5 लाख 54 हजार 100 रुपयांची रक्कम पाठवली. हेही वाचा-'कपडे काढ, नाक घास, झाडू मार...', महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा छळ, शिक्षकाला अटक एवढे पैसे मिळूनही तरुणीची हाव मिटली नाही. यानंतर आरोपी तरुणी फिर्यादीकडे आणखी पैशांची मागणी केली. शेवटी आरोपी तरुणीच्या त्रासाला कंटाळून फिर्यादीनं विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात झिनत शर्मा नावाच्या फेसबूक मैत्रिणीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संबंधित घटना 29 मे 2021 रोजी घडली आहे. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलीस गुन्ह्याचा तपास करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Pune

    पुढील बातम्या