Home /News /maharashtra /

'कपडे काढ, नाक घास, झाडू मार...', महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा छळ, शिक्षकाला अटक

'कपडे काढ, नाक घास, झाडू मार...', महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा छळ, शिक्षकाला अटक

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

Crime in Nanded: आठ दिवसांपूर्वी कॉलेजमध्ये दाखल झालेल्या एका विद्यार्थिनीला अंगावरील कपडे काढायला लावल्याचा धक्कादायक प्रकार नांदेड जिल्ह्यातील हदगाव बामणी फाटा याठिकाणी घडला आहे.

    नांदेड, 16 सप्टेंबर: आठ दिवसांपूर्वी कॉलेजमध्ये दाखल झालेल्या एका विद्यार्थिनीला (College Female student) अंगावरील कपडे काढायला (Forced to Take off clothes) लावल्याचा धक्कादायक प्रकार नांदेड जिल्ह्यातील हदगाव बामणी फाटा याठिकाणी घडला आहे. पीडित मुलगी वसतीगृहात (Hostel ragging) नवीन राहायला आल्याचं पाहून वसतीगृहातील काही सिनियर मुलींनी पीडितेचा छळ केला आहे. संबंधित रॅगिंगचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडितेच्या वडिलांनी हदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (FIR Lodged) केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका शिक्षकाला अटक (Teacher arrest) केली असून घटनेचा पुढील तपास सुरू केला आहे. संबंधित रॅगिंगचा प्रकार नांदेड जिल्ह्याच्या हदगाव बामणी येथील गोविंदराव पऊळ नर्सिंग कॉलेजच्या वसतीगृहात घडला आहे. पीडित मुलीने आठ दिवसांपूर्वी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. त्यानंतर ती महाविद्यालयाच्या वसतीगृहात राहायला गेली होती. दरम्यान, मंगळवारी महाविद्यालयातील तीन वरिष्ठ मुली पीडितेच्या रुममध्ये गेल्या. 'आम्ही तुझ्या सिनियर आहोत' असं म्हणत दमदाटी करायला सुरुवात केली. हेही वाचा-महिलांवरील अत्याचारचं सत्र थांबेना; जालन्यात शाळकरी मुलीला फरफटत नेत बलात्कार तसेच पीडितेचा छळ करत तिला कपडे काढायला भाग पाडलं. तसेच नाक घासायला लावून रुमही झाडायला लावली. ही संतापजनक घटना घडल्यानंतर पीडित मुलगी तक्रार करण्यासाठी शिक्षक भगीरथ शिंदे याच्याकडे गेली. संबंधित शिक्षकानं तिला मदत करण्याऐवजी पीडितेला वाईट हेतूने स्पर्श करायला सुरुवात केली. तसेच शिक्षकानं तिला धमकावल्याचंही पीडितेनं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. शिक्षकानंही आपली तक्रार ऐकून न घेतल्यानं पीडित मुलीनं तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराची माहिती आपल्या वडिलांना दिली. हेही वाचा-विधवेसोबत सेक्स करताना केलं डिस्टर्ब; भूकेनं व्याकूळ आजीला निर्दयीपणे संपवलं दुसऱ्या दिवशी सकाळी पीडित तरुणीचे वडील महाविद्यालयात दाखल झाले. त्यांनी मंगळवारी आपल्या मुलीला घेऊन हदगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी महाविद्यालयातील तीन मुलींसह संबंधित शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपी शिक्षकाला अटक केली आहे. बुधवारी या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वसतीगृहातील काही विद्यार्थिनींनी आरोपी मुलींचा बाजू घेत, आरोपी शिक्षक भगीरथ शिंदे याची सुटका करण्याची मागणी देखील केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Nanded

    पुढील बातम्या