पुणे तिथे काय उणे, रस्त्यावरील खड्यांबाबत केले असे आंदोलन सगळे पाहतच राहिले!

पुणे तिथे काय उणे, रस्त्यावरील खड्यांबाबत केले असे आंदोलन सगळे पाहतच राहिले!

आंबेगाव तालुक्यात मंचर-रांजणी रस्त्यावरील खड्ड्यांवर रांगोळी काढून, खड्ड्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून सर्वपित्री अमावस्या व बैलपोळा निमित्ताने हे आंदोलन केले.

  • Share this:

पुणे, 18 सप्टेंबर : जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात मंचर-रांजणी रस्त्यावरील खड्ड्यांवर रांगोळी काढून, खड्ड्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून  सर्वपित्री अमावस्या व बैलपोळा निमित्ताने आंबेगाव तालुका प्रशासनाचे वाभाडे काढले. तालुका ग्राहक पंचायतीच्या कार्यकर्त्यांनी हे अनोखो आंदोलन केले.

आंबेगाव तालुक्यातील मंचर -रांजणी रस्त्यावरील खड्यांना सर्वपित्री अमावस्याच्या मुहूर्तावर रांगोळी काढून, पुरणपोळीचा नैवद्य दाखवून, आंबेगाव तालुका ग्राहक पंचायतीच्या कार्यकर्त्यांनी  मंचर एस कॉर्नर, चांडोली खुर्द, चांडोली बू, खडकी फाटा, थोरांदळे, रांजणी इतर ठिकाणी निषेध व्यक्त केला.

यावेळी ग्राहक पंचायतीचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर उंडे,संघटक सुभाष मावकर, गणेश थोरात, कैलास मावकर, प्रमिला टेमगिरे ,मंगेश टेमगिरे, दगडू लोखंडे,संदिप  वाबळे ,संतोष बांगर ,जिल्हा उपाध्यक्ष अशोक भोर, जिल्हा ऊर्जा ऊर्जा समिती प्रमुख नितीन मिंडे यांच्यासह या मार्गावरील प्रत्येक गावातून उस्फूर्तपणे कोरोनाचे सर्व नियम पाळून सुमारे  50 ते 60 कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

मंचर  रांजणी हा 112 क्रमाकांचा राज्य मार्ग असून या मार्गावरून पुणे, मंचर मार्गे  बेल्हे, अहमदनगर जिल्ह्यात नागरिकांना जाण्यासाठी जवळचा मार्ग आहे. तसेच आंबेगाव तालुक्याचा आणि जुन्नर तालुक्याचा पूर्व भाग मंचरकडे याच मार्गाने प्रवास करतो. यामध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने प्रवास करतात. शेतमाल, दूध याची वाहतूक होते.

सुमारे एका तासाला या मार्गावरुन लहानमोठी 200 ते 400 वाहने धावत असतात. या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून खड्डे बुजविण्याची मागणी करूनही त्याची दखल घेतली गेली नाही.

'प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंबेगाव तालुका ग्राहक पंचायतीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. प्रशासनाने या मार्गावरील खड्डे त्वरित बुजावेत' असे आवाहन पुणे जिल्हा ग्राहक पंचयतीचे नितीन मिंडे यांनी केले आहे. या अभिनव आंदोलनाने प्रशासनाला जाग येईल, असे मिंडे म्हणाले.

Published by: sachin Salve
First published: September 18, 2020, 8:49 AM IST

ताज्या बातम्या