पुणे 26 फेब्रुवारी : वादग्रस्त एल्गार परिषद प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना समन्स बजावण्यात येणार आहे. या प्रकरणाची चौकशी करणारा आयोग हा साक्षीसाठी बोलावण्याची शक्यता आहे. या प्रकरणी पवारांनी पुणे पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला होता. परिषदेतल्या सामाजिक कार्यकर्त्यांवर पोलिसांनी पूर्वग्रहदुषित भावनेने गुन्हे नोंदवले होते असा आरोपही पवारांनी केला होता. तसेच या प्रकरणाची राज्य सरकारने SIT मार्फत चौकशी करावी अशी मागणीही केली होती. त्यावर राज्यात वादळ निर्माण झालं होतं.
पवारांच्या या मागणीनंतर तीनच दिवसांमध्ये केंद्र सरकारने तातडीने निर्णय घेत एल्गारचा तपास NIAकडे दिला होता. त्यावर राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये शितयुद्धही सुरू होतं. नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा तपास NIAकडे देण्यास मंजुरी दिली होती. त्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये धुसफूसही झाली होती.
शेजारी झोपलेल्या मालकाला चादर मागितली तर हाकललं, कामगाराने डोक्यात घातला रॉड
या दरम्यान झालेल्या दंगलीची चौकशी करण्यासाठी तत्कालीन सरकारने निवृत्त न्यायमूर्ती जे. एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखाली एका आयोगाची स्थापना केली होती. हा आयोग आता चौकशी करत आहेत. विवेक विचार मंच या सामाजिक संघटनेचे सदस्य सागर शिंदे यांनी या प्रकरणात पवारांची साक्ष घ्यावी अशी विनंती करणारा अर्ज आयोगापुढे सादर केला होता अशी माहिती 'लोकमत'ने दिली आहे.
पुण्यातील सहकारी बॅंक गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीच्या आमदारासह चौघांना अटक
त्यावरून आयोगाने पवारांना साक्षीसाठी बोलावण्यात येणार असल्याचं मान्य केल्याची माहिती वकिल आशीष सातपुते यांनी दिलीय. आयोगाची मुदत संपण्यापूर्वी ही साक्ष होऊ शकते अशी माहितीही त्यांनी दिलीय.