नागपूर, 26 फेब्रुवारी : ढाब्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यानंच मालकाची निर्घृण हत्या केल्यानं नागपुरात खळबळ उडाली आहे. पोटापाण्यासाठी ढाब्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यानंच क्षुल्लक कारणावर मालकाची हत्या केली. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे. ही घटना मंगळवारी रात्री नागपूर-जबलपूर महामार्गावर असलेल्या वडांबा गावात पहाटेच्या घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना पहाटे 5च्या सुमारास घडली आहे. हा ढाबा पोलिसांनी सील केला आहे. रात्रीच्या जेवणाची कामं आवरून ढाबा कर्मचारी आणि मालक झोपी गेले. पहाटे थंडी वाजत असल्यानं कर्मचाऱ्यानं ढाबा मालक बालगोविंद जायसवाल यांच्याकडे कांबळं मागितलं. मात्र त्यावेळी मालकानं देण्यास नकार दिला. त्यातून वाद झाला आणि राग अनावर झाल्यानं कर्मचारी कारा नारायण सिंह बवाड याने मालकाचं डोकं पकडून लोखंडी रॉडवर जोरात आपटलं. हेही वाचा-हिंसाचाराने धुमसते दिल्ली, 13 जणांचा मृत्यू तर अनेक गंभीर जखमी डोक्याला जबर मार लागल्यामुळे ढाबा मालकाचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपीविरोधात तक्रार नोंदवून त्याला अटक केली आहे. थंडी वाजत असताना कांबळ (अंगावर घेण्यासाठी चादर)न दिल्यानं रागाच्या भरात मालकाची हत्या केल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान क्षुल्लक कारणातून झालेल्या य़ा हत्येमुळे गावात मोठी खळबळ उडाली आहे. हेही वाचा-पुण्यातील सहकारी बॅंक गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीच्या आमदारासह चौघांना अटक
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.