विरार, 14 ऑक्टोबर : विरार रेल्वे स्थानकाजवळ (Virar Railway Station) एका चोरट्याने तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हर्षल वैद्य (Harshal Vaidya) असं मृत्यू झालेल्य तरुणाचे नाव असून तो विलेपार्ले (Vile Parle) येथे राहणारा आहे. काल रात्री 11 वाजताच्या सुमारास हर्षल आपल्या विरारमधील नातेवाईकांकडे पूजा आटपून पुन्हा घरी परतत होता. यावेळी रेल्वे स्थानकात तिकीट काढत असताना एक चोरटा त्याचे पाकीट हिसकावून पसार झाला.
हर्षदने या चोरट्याचा पाठलाग केला असता तो विरार रेल्वे स्थानकाबाहेरील श्रेया हॉटेलच्या गल्लीत लपून बसला. तिथे हर्षद त्याला पकडण्यासाठी गेला असता चोरट्याने त्याच्यावर धारदार चाकूने जीवघेणा हल्ला केला. या घटनेत हर्षल वैद्य याचा जागीच मृत्यू झाला. मात्र त्याने दाखवलेल्या धाडसामुळे चोरट्याला पकडण्यात यश आले आहे. विरार पोलिसांनी या चोरटच्या विरोधात हत्येचा गुन्हा नोंद केला असून अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
गाडीला कट मारल्याने पुण्यातील तरुणाची हत्या
गाडीला ओव्हरटेक करणं किंवा कट मारल्याच्या कारणावरुन अनेकदा वाहन चालकांमध्ये वाद होत असतात. असाच काहीसा प्रकार पुण्यात घडला आहे. मात्र, या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं आणि त्यात एका दुचाकीस्वाराला आपले प्राण गमवावे लागले आहेत. पुण्यातील उरुळी कांचन परिसरात ही घटना घडली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, 23 वर्षीय अक्षय टिळेकर हा तरुण आपल्या दुचाकीवरुन जात होता. बुधवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास अक्षयच्या दुचाकीचा एका फोर व्हीलर गाडीला धक्का लागला. या मुद्द्यावरुन कारमधील चौघांनी अक्षयसोबत वाद घालण्यास सुरुवात केली.
हा वाद इतका विकोला गेला की, कारमधील चौघांनी मिळून अक्षयला मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत अक्षय बेशुद्ध झाला. या घटनेनंतर अक्षयला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच अक्षयचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यावर लोणी काळभोर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
बदलापुरात सुनेवर वार करुन सासऱ्याने पेटवलं घर
कौटुंबिक वाद विकोपाला गेला आणि सासऱ्याने सुनेवर वार केल्याची घटना समोर आली आहे. बदलापूर पश्चिम परिसरातील शनी नगर येथे ही घटना घडली आहे. सुनेवर हल्ला केल्यानंतर सासऱ्याने घर पेटवून दिलं. या घटनेने संपूर्ण बदलापुरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, किसन जाधव हे बदलापुरात आपला मुलगा, सुन आणि दोन नातवंडांसोबत राहत होते. बुधवारी दुपारच्या सुमारास किसन जाधव यांचा सुनेसोबत वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, किसन जाधव यांनी थेट सुनेवर हल्ला केला. घटनेच्यावेळी किसन जाधव यांचा मुलगा कामावर गेला होता तर दोन्ही नातवंड ही घराबाहेर खेळायला गेली होती.
किसन जाधव यांनी सुनेवर हल्ला केला असता तिने आरडा-ओरड करण्यास सुरुवात केली. तिचा आवाज ऐकून शेजारी त्यांच्या घरात दाखल झाले. किसन जाधव यांनी केलेल्या हल्ल्यात सुन गंभीर जखमी झाली होती. शेजाऱ्यांनी तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या घटनेनंतर किसन जाधव यांनी घराचा दरवाचा आतून लावला आणि घर पेटवून दिले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.