पिंपरी चिंचवड, 17 ऑगस्ट : पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हेगारी घटनांचे सत्र सुरूच आहे. शहरात लॉकडाउन सुरू असताना दोन भामट्यांनी याचा फायदा घेत घरातच बनावट नोटा छापखाना सुरू केला होता. पोलिसांनी या दोघांना 3 लाखांच्या मुद्देमालासह अटक केली.
पिंपरी चिंचवडमधील निगडी परिसरात ही खळबळजनक घटना घडली आहे. या दोन तरुणांनी लॉकडाउनच्या काळात सर्वत्र बंद असल्यामुळे घरी कुणीही येणार नाही याची खात्री केली होती. त्यामुळे त्यांनी घरातच बनावट नोटा प्रिंट करण्याचा गोरखधंदा सुरू केला. दोघांनीही घरात फक्त 2000 च्या नोटांची छपाई केली. त्यानंतर जेव्हा शहरात अनलॉक करण्यात आले होते. तेव्हा त्यांनी या नोटा शहरातच वस्तू खरेदी करण्यासाठी वापरल्या. अचानक बाजारात 2000 च्या बनावट नोटा व्यापाऱ्यांकडे आल्यामुळे एकच खळबळ उडाली.
मुलांनी बापाचे पार्थिव नेले सायकलवर अन् अख्खे गाव फक्त पाहत होते!
याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तपासाची सूत्र फिरली. त्यानंतर पोलिसांना खबऱ्याच्या मार्फत माहिती मिळाली की, पिंपरी चिंचवडच्या निगडी भागात घरकुल परिसरात दोन तरुणांनी घरात नोटा छापल्या. त्यानंतर, पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे आणि त्यांच्या टीमने या घरावर छापा टाकून दोन्ही तरुणांना अटक केली. दोघांकडून यावेळी तब्बल 3 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यावेळी बनावट नोटा आणि नोटा छापण्यासाठी वापरले जाणारे प्रिटर पोलिसांनी ताब्यात घेतले. आपल्या घरातच प्रिंटरच्या साह्याने हे दोघे बनावट नोटा छापत असल्याचे समोर आले.
पाण्यात उडी मारण्याचा स्टंट बेतला जीवावर, तरुणासोबत काय घडलं पाहा VIDEO
पोलिसांनी या तरुणांकडे कसून चौकशी केली असता या दोघांना पुण्यातील एक मित्राने मदत केली. तसंच मुंबईतील खलील नावाच्या एक व्यक्ती या तरुणांचा संपर्कात होता. त्यामुळे या प्रकरणामागे रॅकेट असल्याची शक्यता आहे. पोलिसांनी या दोघांनीही ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.