बेळगाव, 17 ऑगस्ट : बेळगाव जिल्ह्यत पुन्हा एकदा मानवतेला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. गावकऱ्यांनी अंत्यसंस्काराला जाण्यास नकार दिल्यानंतर मुलांनी त्यांच्या बापाचा मृतदेह सायकलवरून स्मशानभूमीत नेल्याची मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे.
कित्तूर तालुक्यातील एमके हुबळी गावातील 70 वर्षीय व्यक्तीची 15 ऑगस्ट रोजी अचानक प्रकृती बिघडली होती. या व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करायचे होते पण वेळेवर रुग्णवाहिका मिळाली नाही. त्यामुळे या वृद्धावर कोणतेही उपचार झाली नाही, अखेर राहत्या घरात या वृद्धाचा मृत्यू झाला.
वृद्धाचा मृत्यू झाल्यामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. कुटुंबीयांनी अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. पण त्या व्यक्तीच्या निधनानंतर गावकऱ्यांनी कोरोनाच्या भितीने आणि अफवेमुळे अंत्यसंस्काराला येण्यास नकार दिला. अगदी नातेवाईकांनीही अंत्ययात्रेत भाग घेण्यास नकार दिला. त्यामुळे शववाहिका आणि इतर वाहन मिळवण्यासाठी मुलाने प्रयत्न केला. पण, वेळेवर तेही मिळाले नाही.
त्यामुळे हताश झालेल्या मुलांनी मृतदेह सायकलवरून नेला आणि जन्म दात्याबापावर अंत्यसंस्कार केले. यावेळी घरच्या व्यतिरिक्त स्मशानभूमीत कोणीही उपस्थित नव्हतं. गावातून मुलं आपल्या जन्मदात्या बापाला सायकलीवर स्मशानभूमीत घेऊन गेले पण कुणीही समोरं आलं नाही.
बेळगाव जिल्ह्यातील ही पहिली घटना नाही. काही दिवसांपूर्वी रुग्णवाहिकेच्या अभावामुळे 5 किलोमीटरपर्यंत एक पत्नीने आपल्या पतीचा मृतदेह हातगाडीवरून नेला होता. या घटनेची चर्चा संपूर्ण देशात झाली होती. आता आणखी एक तशीच घटना समोर आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.