मराठी बातम्या /बातम्या /देश /

पाण्यात उडी मारण्याचा स्टंट बेतला जीवावर, तरुणासोबत काय घडलं पाहा VIDEO

पाण्यात उडी मारण्याचा स्टंट बेतला जीवावर, तरुणासोबत काय घडलं पाहा VIDEO

पाण्याचा प्रवाह जास्त असल्यानं हा तरुण पुन्हा पोहत वर येऊ शकला नाही.

पाण्याचा प्रवाह जास्त असल्यानं हा तरुण पुन्हा पोहत वर येऊ शकला नाही.

पाण्याचा प्रवाह जास्त असल्यानं हा तरुण पुन्हा पोहत वर येऊ शकला नाही.

  • Published by:  Kranti Kanetkar

बिलासपूर, 17 ऑगस्ट : एका तरुणानं नदीत उडी घेतल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या तरुणानं पाण्यात उडी मारली खरी पण पाण्याचा प्रवाह जास्त असल्यानं तो नदीतून पोहून बाहेर येऊ शकला नाही. हा व्हिडीओ छत्तीसगडमधील बिलासपूर गावातील असल्याची माहिती मिळत आहे. हा व्हिडीओ खुंटाघाट परिसरातील असल्याची माहिती मिळत आहे.

पाण्याचा प्रवाह जास्त असल्यानं हा तरुण पुन्हा पोहत वर येऊ शकला नाही. स्थानिकांच्या कॅमेऱ्यात ही संपूर्ण घटना कैद झाली आहे. या घटनेची माहिती NDRF आणि पोलिसांना देण्यात आली. हा तरुण पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत गेला होता. या तरुणानं एका झाडाला पकडून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न गेला.

हे वाचा-Ferari Ki Sawari पडली महागात! पोलिसांसमोर करायला गेला स्टंट, पोहचला थेट तुरुंगात

एक झाड आणि दगडाचा आधार घेऊन तो मदतीसाठी याचना करू लागला. दूरपर्यंत फक्त पाण्याचा वेगानं वाहणारा प्रवाह होता. हात निसटला तर सगळंच संपलं हे याची भीती होती. हा तरुण झाडाच्या मदतीनं दगडावर चढला आणि तिथेच बसून होता. अखेर NDRF आणि पोलिसांनी हवाई दलाची मदत घेतली आणि या तरुणाला रेस्क्यू केलं आहे.

आत्महत्येचा प्रयत्न होता की स्टंट? या तरुणानं का उडी मारली हे याचं कारण अद्याप समोर येऊ शकलं नाही. या तरुणाचा जीव वाचवण्यात पोलीस, एनडीआरएफ आणि हवाई दलाला यश आलं आहे.

First published:

Tags: Viral video.