मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

गृहकलहामुळे नांदायला तयार नसलेल्या पत्नीला मारहाण करून कापले तिचे सुंदर केस

गृहकलहामुळे नांदायला तयार नसलेल्या पत्नीला मारहाण करून कापले तिचे सुंदर केस

(प्रातिनिधीक फोटो)

(प्रातिनिधीक फोटो)

धक्कादायक म्हणजे पत्नीला विद्रुप करण्याच्या उद्धेशाने पतीने तिचे सुंदर केसही कापल्याचं समजतंय.

पिंपरी- चिंचवड, 05 ऑगस्ट: गृहकलहामुळे नांदायला तयार नसलेल्या पत्नीला मारहाण करण्यात आल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये (pimpri chinchwad) घडली आहे. धक्कादायक म्हणजे पत्नीला विद्रुप करण्याच्या उद्धेशाने पतीने तिचे सुंदर केसही कापल्याचं समजतंय. (Pune Crime)

याहून धक्कादायक बाब म्हणजे आपल्यावर पतीकडून झालेल्या अत्याचाराची तक्रार देण्यासाठी जेव्हा पीडिता पोलीस स्टेशनमध्ये गेली. तेव्हा पोलिसांनी तिला 6 तास थांबवून ठेवत पीडितेचीच खिल्ली उडवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

अमृता उर्फ कोमल वाल्हेकर असं या घटनेतील पीडितेच नाव असून पतीने आपले सुंदर केस कापून मारहाण केल्याच्या धक्क्यानं तिला जबर मानसिक धक्का बसला आहे. ही घटना काल सकाळच्या सुमारास घडल्याचं कोमलच म्हणणं आहे.

इतर ठिकाणची गर्दी चालते, तर लोकलमधील का नाही? हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल

आपला दारुडा पती आपल्याला मारहाण करत असल्याने मागील 2 वर्षांपासून आपण आईकडे राहत आहे. मात्र काल आपल्या पतीने आपल्याला एकट बघून गाठलं आणि ओढत घरी नेऊन मारहाण केली आणि केसही कापल्याच कैफियत पीडित कोमलने News18 लोकमत कडे मांडली.

घडलेल्या प्रकाराबाबत तक्रार देण्यासाठी कोमल पोलिसांकडे गेली. मात्र ती ज्या स्टेशनमध्ये गेली तेथील पोलीस कुणाचा तरी वाढदिवस करण्यात मश्गुल होते असंही कोमलनं सांगितलं. जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार घेतली गेली नाही. तेव्हा पोलीस मुख्य स्टेशनला जाऊन तिने फिर्याद दिली आणि हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान कोमलला मारहाण करणारा तिचा पती नरेंद्र वाल्हेकर अजूनही मोकाट असल्याने सदरक्षणाय खल निग्रहणाय हे ब्रीद वाक्य वापरणारे पोलीस खरंच सर्व सामन्याच्या सुरक्षेसाठी आहेत का? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

First published:

Tags: Pune crime, Women, Women harasment