मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

ज्या झाडाला आंबे लागतात.., गँगस्टर पत्नीच्या भाजप प्रवेशावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

ज्या झाडाला आंबे लागतात.., गँगस्टर पत्नीच्या भाजप प्रवेशावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

'स्वाती मोहोळ आणि गायंत्री लांडे यांचा शक्तीप्रदर्शन करण्याचा उद्देश काय? हे त्यांनाच विचारा, त्यांना प्रवेश देण्यासंदर्भात निर्णय केलेला नाही'

'स्वाती मोहोळ आणि गायंत्री लांडे यांचा शक्तीप्रदर्शन करण्याचा उद्देश काय? हे त्यांनाच विचारा, त्यांना प्रवेश देण्यासंदर्भात निर्णय केलेला नाही'

'स्वाती मोहोळ आणि गायंत्री लांडे यांचा शक्तीप्रदर्शन करण्याचा उद्देश काय? हे त्यांनाच विचारा, त्यांना प्रवेश देण्यासंदर्भात निर्णय केलेला नाही'

पुणे, 26 ऑक्टोबर :  पुणे महापालिका निवडणुकीच्या (pune municipal corporation election) तोंडावर आता आयाराम-गयारामांनी राजकीय पक्षांची वाट धरली आहे. आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांच्या कार्यक्रमात कुख्यात गुंड शरद मोहोळच्या (pune gangster sharad mohol)  पत्नीने भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी धडाकेबाज एंट्री घेतली. पण, प्रवेश मात्र देण्यात आला नाही. 'ज्या झाडाला आंबे लागतात, त्यालाच लोकं दगड मारतात' असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी कुणालाही प्रवेश दिला नाही, असं स्पष्ट केलं.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणाऱ्या कॉफी टेबल बुकच पुण्यात प्रकाशन झालं. यावेळी गुंड शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांनी चंद्रकांत पाटील यांचा विशेष सत्कार केला. यावेळी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते त्यांनी शक्तिप्रदर्शन करण्यासाठी आणले होते. त्याचबरोबर संदीप मोहोळ यांच्या हत्येप्रकरणी तुरुंगात असलेला संतोष लांडे यांची पत्नी गायत्री लांडे यांनीही जोरदार शक्ती प्रदर्शन करत चंद्रकांत पाटलांचा सत्कार केला.

लग्नातील मस्ती नवरीबाईला पडली भारी, नवरदेवही वाचवूू शकला नाही; VIDEO VIRAL

परंतु, स्वाती मोहोळ आणि गायत्री लांडे यांना प्रवेश देण्याचे आज टाळले. याबद्दल चंद्रकांत पाटलांना पत्रकारांनी विचारले असता पाटील म्हणाले की, 'हा कार्यक्रम कोथरुडमधील नागरिकांचा होता. यासाठी कोणी यावं किंवा कोणी येऊ नये यासाठी पासेस नव्हते. कार्यक्रमाला उत्स्फूर्तपणे अनेक जण आले. इतर क्षेत्रातील अनेक जण आले ते दिसले नसतील तुम्हाला, यात राजकीय हेतू कोणताही नव्हता'

चायनीज गाडीवरचा गल्ला पळवला, पाठलाग करून तरुणाची भर रस्त्यावर केली हत्या

स्वाती मोहोळ आणि गायंत्री लांडे यांचा शक्तीप्रदर्शन करण्याचा उद्देश काय? हे त्यांनाच विचारा, त्यांना प्रवेश देण्यासंदर्भात निर्णय केलेला नाही. महापालिका निवडणुका अजून दूर, प्रवेशाचा विषय आज नाही. प्रभाग रचना तयार व्हायची आहे, खूप निर्णय व्हायचे आहेत, डोन्ट वरी, भारतीय जनता पार्टी इतकी शक्तीमान झालीय. आता छोट्या पवारांकडून होणार नाही म्हणून आता मोठे पवारही उतरलेत. अशा शक्तीमान पार्टीकडेच लोक येणार आहे. कोणाला घ्यायचं याचा निर्णय शहराची नऊ जणांची कोअर टीम घेते. शेवटी ज्या झाडाला आंबे लागतात, त्यालाच लोकं दगड मारतात, असंही पाटील म्हणाले.

कोण आहे शरद मोहोळ?

शरद मोहोळ हा दहशतवादी कातील सिद्दीकी खून प्रकरणातील आरोपी होता. न्यायालयाने त्याची सबळ पुराव्याअभावी मुक्तता केलेली आहे. मोहोळ आणि त्याचा साथीदार आलोक भालेराव यांनी 2012 मध्ये कातील सिद्दीकीचा येरवडा जेल मध्ये खून केल्याचा आरोप आहे.

एवढंच नाहीतर शरद मोहोळवर याशिवाय मोक्का अनव्यये अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, याप्रवेशाची चर्चा सुरू झाल्यानंतर भाजपच्या अनेक जुन्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी कार्यक्रमातून काढता पाय घेतला. तर भाजपने आयत्या वेळी हे प्रवेश टाळत केवळ सत्काराचा कार्यक्रम केला.

First published: