• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • चायनीज गाडीवरचा गल्ला पळवला, पाठलाग करून तरुणाची भर रस्त्यावर केली हत्या

चायनीज गाडीवरचा गल्ला पळवला, पाठलाग करून तरुणाची भर रस्त्यावर केली हत्या

पोलिसांनी या प्रकरणी 5 जणांना अटक केली असून यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.

पोलिसांनी या प्रकरणी 5 जणांना अटक केली असून यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.

पोलिसांनी या प्रकरणी 5 जणांना अटक केली असून यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.

  • Share this:
भिवंडी, 26 ऑक्टोबर : भिवंडीत (bhiwandi) एका चायनीज (Chinese ) गाडीवरील पैश्याचा गल्ला पळविण्याच्या वादातून चायनीज गाडीच्या मालकासह 5 जणांच्या टोळक्याने 32 वर्षीय तरुणाची भररस्त्यात हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी 5 जणांना अटक केली असून यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  भिवंडी शहरातील वंजारपट्टी नाका परिसरातील  मेट्रो हॉटेलजवळ असलेल्या चायनीजच्या गाडीवर घडली आहे. शफिक महबूब शेख( ३२) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो भिवंडीतील म्हाडा कॉलोनी परिसरात राहत होता.  भर चौकात पकडून  लाथाबुक्क्यांनी या पाच जणांच्या टोळक्याने त्याला बेदम मारहाण केली. अंडरवियरमध्ये लपवली सोन्याची पेस्ट, असा फसला ‘OLD STYLE’ तस्करीचा प्रयत्न याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात हत्येसह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून 5 जणांना अटक केली असून हत्या करणाऱ्या आरोपींमध्ये तिघा बाप बेट्यांचा समावेश आहे. अफजल नूरमोहम्मद सिद्धीकी (वय २७) अफसर नूरमोहम्मद सिद्धीकी (वय २६) मो. बशीर अन्सारी (वय २८) नूर मोहम्मद मकदूमबक्ष सिद्धीकी उर्फ पुरीभाजीवाला उस्ताद (वय,६४) असे हत्येप्रकरणी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. विशेष म्हणजे, आरोपीमध्ये तिघा बाप बेट्यांचा समावेश असून तिघेही भिवंडीतील नदीनाका भागात राहणारे असून यामध्ये आरोपीमध्ये  एक साडे चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. आरोपी अफजल नूर मोहम्मद याचे मेट्रो हॉटेलजवळ असलेल्या अबूजी बिल्डिंगसमोर चायनीजची गाडी आहे. या गाडीवर सोमवारी सव्वा अकराच्या सुमारास मयत शफिक हा आला होता. त्यावेळी त्याने चायनीज गाडीवरील काम करणाऱ्या कारागिराशी वाद घातला. त्यांनतर गाडीवरील पैश्याचा गल्ला पळविला असता, पाचही आरोपींनी मृत शफिकला मेट्रो हॉटेलजवळील चौकात पकडून त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर शफिकला शहरातील इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. नदीत वाहून आलेल्या बोटं आणि मांस प्रकरणाचे गुढ उकलले,खेडमधील मनसुन्न करणारी घटना यामुळे मृतक  शफिकच्या नातेवाईकांनी घटनस्थळी एकच गोंधळ घातला होता.  या मारहाणीत शफिकचा मृत्यू  झाल्याचे समजताच  वंजारपट्टी नाका परिसरात आणि रुग्णालयच्या एकच तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणून निजामपूर पोलिसांनी पंचनामा करीत हत्येसह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास पाचही आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली आहे.
Published by:sachin Salve
First published: