पुणे, 28 जानेवारी : भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधी सोहळ्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने आले आहे. जयंत पाटील यांच्या या दाव्यावर भाजपकडून अजूनही खास अशी प्रतिक्रिया उमटलेली नाही, पण, 'काही प्रश्नांची उत्तरं कधीच मिळत नाही. देवेंद्र फडणवीस मॅच्युर आहेत. ज्या वेळेस ते पुस्तक लिहतील त्यावेळेसच कळेल की नेमकं काय झालं' असं प्रत्युत्तर भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
पुण्यात कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपने आढावा बैठक घेतली यावेळी पत्रकारांशी बोलत असताना चंद्रकांत पाटील राजकीय घडामोडींवर भाष्य केलं.
पंतप्रधान मोदी यांनी २०१४ पासून एकदा ही देशात राष्ट्रपती राजवट लागली नाही. आम्ही मोदींचे वारस असल्यामुळे कोण काय बोलतो ते बघितलं नाही. काही प्रश्नांची उत्तरं कधीच मिळत नाही (पहाटेचा शपथविधी). देवेंद्रजी mature आहेत. ज्या वेळेस ते पुस्तक लिहितील त्यावेळेसच कळेल की नेमकं काय झालं, असं म्हणत पाटील यांनी राष्ट्रवादीला टोला लगावला.
(हेही वाचा : महाविकासआघाडीत यायचं असेल तर... पवारांवरच्या टीकेनंतर राऊतांचा आंबेडकरांना इशारा)
'आज कसबा विधानसभा पोटनिवडणूक लागली त्याची पूर्वतयारी सुरू झाली. त्यासाठीच आज आम्ही महाबैठक झाली
या मतदारसंघात 275 बुथ आहेत. प्रत्येक नगरसेवकाला बुथ वाटून दिलेतय सर्व पक्षांना बिननिरोध निवडणूक करण्यसाठी आम्ही विनंती पत्र देणार आहोत. विरोधी पक्षांनी ऐकलं तर ठीक नाहीतर निवडणुकीला आम्ही तयार आहोत, असंही चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केलं.
'कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान हे आधी २७ रोजी होते पण त्यानंतर रविवारी २६ रोजी होणार आहे.
पूर्वतयारी सुरुवात झाली आहे. नगरसेवक यांच्याकडे मी जाऊन आलो आहे. आज आम्ही कार्यकर्त्यांची बैठक बोलावली पण ती बैठक न होता महाबैठक झाली. संघटना म्हणून रचना पूर्ण झाली. एक शक्ती केंद्र तयार करणार एक केंद्र एका नगरसेवकाला दिले जाईल, असं पाटील म्हणाले.
(राज्यात उद्योग आले की नाही? नजर ठेवण्यासाठी आले शिंदे सरकारचे टास्क फोर्स)
चिंचवड पोटनिवडणुकीसाठी महेश लांडगे राजकीय रणनीतीसाठी गेले आहेत. कसबामध्ये माधुरीताई आहेत
हे दोघे ही सगळ्यांना भेटून इतर सगळ्या पक्षांना भेटतील. आज इच्छुकांचे फॉर्म प्रदेशाध्यक्षांकडे गेलं आहे. त्यानंतर आता अध्यक्ष बैठक घेतली जाईल. तिघांची लिस्ट दिल्लीकडे जाईल आणि त्यानंतर १, २ तारखेला उमेदवार जाहीर होऊ शकतो, अशी माहितीही पाटील यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.