मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /महाविकासआघाडीत यायचं असेल तर... पवारांवरच्या टीकेनंतर राऊतांचा आंबेडकरांना इशारा

महाविकासआघाडीत यायचं असेल तर... पवारांवरच्या टीकेनंतर राऊतांचा आंबेडकरांना इशारा

शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती झाल्यानंतर महाविकासआघाडीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकर यांना इशारा दिला आहे.

शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती झाल्यानंतर महाविकासआघाडीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकर यांना इशारा दिला आहे.

शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती झाल्यानंतर महाविकासआघाडीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकर यांना इशारा दिला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 26 जानेवारी : शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती झाल्यानंतर महाविकासआघाडीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. ठाकरे-आंबेडकर युती झाल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांबाबत मोठा गौप्यस्फोट केला. शरद पवारांबाबतच माझं आधीपासूनचं मत कायम आहे. शरद पवार हे भाजपबरोबर आहेत. तुम्हाला लवकरच कळेल, तुम्ही डोळेझाक करून चालला आहात माझ्यासाठी हे अजिबात धक्कादायक नाही', असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

प्रकाश आंबेडकर यांच्या या विधानानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी इशारा दिला आहे. महाविकासआघाडी करायची असेल तर या आघाडीतले प्रमुख स्तंभ आणि नेते आहेत त्यांच्याविषयी आदर ठेवून बोललं पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

'अशाप्रकारची विधानं कुणीही करू नयेत, शरद पवार हे महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देशामध्ये भाजपविरोधात जी आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न होतोय, त्याच्यात प्रमुख स्तंभ आहेत. ते सातत्याने आघाडीचे प्रयत्न करत आहेत', असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं.

'भाजपच्या यंत्रणेनं सर्वाधिक हल्ले शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबियांवर केले आहेत. शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांची युती झाली आहे. सध्या शिवसेना-वंचित यांच्यातच युती आहे. आंबेडकर भविष्यात महाविकासआघाडीचे घटक होतील, अशी आमची अपेक्षा आहे. जर असं होणार असेल आणि ती प्रक्रिया सुरू असेल तर या आघाडीतले प्रमुख स्तंभ आणि नेते आहेत त्यांच्याविषयी सर्वांनी आदर ठेवून बोललं पाहिजे', अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

प्रकाश आंबेडकर यांचे शरद पवारांसोबत मतभेद असू शकतात, हे मतभेद आम्ही एकत्र बसून दूर करू, असंही संजय राऊत म्हणाले.

याआधी प्रकाश आंबेडकर यांनी महाविकासआघाडीबाबत आणखी एक विधान केलं होतं. आपली युती ही ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आहे, महाविकासआघाडीसोबत नाही. आपल्याला महाविकासआघाडीसोबत युती करण्याची इच्छा नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले होते.

First published:

Tags: Prakash ambedkar, Sharad Pawar, Shivsena, Uddhav Thackeray