मुंबई, 28 जानेवारी : राज्यातील उद्योगांवरून गेल्या काही महिन्यांपासून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये वादविवाद पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यात खरेच उद्योग आले की नाही. येणार असतील तर परिस्थिती काय आहे, याचा आढावा आणि लक्ष ठेवण्यासाठी शिंदे फडणवीस सरकारने आता टास्क फोर्स अर्थात कृती दलाची स्थापना केली आहे.
(भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनाम्यानंतर नवे राज्यपाल कोण? मोठी अपडेट आली समोर!)
राज्यातील अनेक उद्योग परराज्यात चालल्याने विरोधक सत्ताधाऱ्यांवर तुटून पडत आहेत. त्यात आता शिंदे फडणवीस सरकारकडून आपण आणलेल्या उद्योगासंदर्भात उद्योग विभागांतर्गत झालेल्या आणि होणाऱ्या विविध सामंजस्य करारांचा आणि इतर प्रलंबित महत्वाच्या विषयांचा आढावा घेण्याकरीता कृती दल (Task Force) स्थापन करण्यात आले आहे.
कृती दलाचा काम काय असेल ?
गुंतवणूकदारांच्या अडचणी व गुंतवणूकीतील अडथळ्यांसंदर्भात कृती दलाच्या बैठकीत होणाऱ्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यकतेप्रमाणे संबंधित विभाग व अधिकाऱ्यांशी संपर्क करणे
२ ) शासनाच्या वतीने करण्यात आलेल्या सामंजस्य करारांचा पाठपुरावा करणे
३ ) सामंजस्य कराराच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणींची माहिती घेणे व त्यांचे निराकरण करणे
४ ) सामंजस्य कराराबाबतच्या सद्यस्थितीबाबतची माहिती घेणे व अद्ययावत ठेवणे
५ ) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडील तसेच त्यांचे क्षेत्राबाहेरील जमीन संपादन व वाटप यासंबंधीची कार्यवाही करणे
६ ) उद्योग स्थापित करण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या मंजूऱ्यांसंदर्भात आढावा घेणे
(हेही वाचा : महाविकासआघाडीत यायचं असेल तर... पवारांवरच्या टीकेनंतर राऊतांचा आंबेडकरांना इशारा)
कृती दलाचे सदस्य कोण असतील ?
अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव ( उद्योग ) , सह मुख्य कार्यकारी अधिकारी ( स्पेशल प्रोजेक्टस ) , महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ , अंधेरी , मुंबई . ३ . सह सचिव ( उद्योग -१४ ) / उप सचिव ( उद्योग -८ ) , उद्योग , ऊर्जा व कामगार विभाग , मंत्रालय , मुंबई . विकास आयुक्त ( उद्योग ) , उद्योग संचालनालय , मुंबई सदस्य सचिव आवश्यकतेनुसार मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण निमंत्रित सदस्य ( एमएमआरडीए ) , सिडको , नगर विकास , पर्यावरण , ऊर्जा , कामगार , महसूल व वन विभाग व इतर विभागांशी संबंधित निमंत्रित सदस्य हे या कृती दलात काम करतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.