पुणे, 02 नोव्हेंबर : दादरा-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये (dadra and nagar haveli election result) शिवसेनेनं (shivsena) भाजपाला आस्मान दाखवत दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयामुळे शिवसेनेच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. ‘देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीनंतर बॉम्ब फोडण्याचा इशारा दिला आहे. पण त्यांनी आता दिवाळीत फराळ खावा आणि चांगले संगीत ऐकावे’ असा खोचक टोला शिवसेनेच्या नेत्या नीलमताई गोऱ्हे (Neelam Gorhe ) यांनी लगावला. पुण्यात दिवाळीच्या निमित्ताने शिवसेनेच्या वतीने किल्ले स्पर्धा प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत असताना दादरा हवेली लोकसभा पोटनिवडणूक आणि नांदेड देगलूर पोटनिवडणुकीतील विजयानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांचा उत्साह चांगलाच वाढला आहे. याच विजयाचं निमित्त साधत शिवसेना नेत्या निलमताई गोऱ्हे यांनी देवेंद्र फडणवीस यांना मिश्किल टोला लगावला. लेकीच्या हत्येसाठी बापाला डांबलं तुरुंगात, 3 वर्षांनी मुलगीच आली समोर देवेंद्र फडणवीस यांनी बॉम्ब फोडण्याच्या धमक्या देत आहे. पण, कसं आहे, बॉम्बची व्याख्या प्रत्येकाची वेगळी असते. बॉम्ब हा चॉकलेट आहे, शेवेचा आहे की आणखी काही आहे हे पाहावं लागेल. देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळी सुखामध्ये घालवावी. काहीतरी भाष्य करण्यापेक्षा फराळ खाऊन आणि संगीत ऐकून निवांतपैकी दिवाळीचा आनंद घ्यावा, असा चिमटा निलमताईंनी फडणवीसांना काढला. तसंच, देवेंद्र फडणवीस यांनी काही तरी भाष्य करत राहण्यापेक्षा दादरा नगर हवेली आणि नांदेडमध्ये जे काही निकाल लागले आहे. ते पाहावं, फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते म्हणून चांगलं काम करावं, असं लोक म्हणत आहे, असा टोलाही गोऱ्हे यांनी लगावला. T20 World Cup : ‘…त्यांना माफ कर’, विराटसाठी राहुल गांधी उतरले मैदानात! पुणे महापालिका निवडणुकीबद्दल आताच भाष्य करणे हे योग्य नाही. मुंबई आणि पुणे महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकेल. भाजपने कसा खोटा प्रचार केला आहे, याचा बुरखा फाटणार आहे. या दोन्ही ठिकाणी कशी रननीती आखायची आहे, हे पक्षाचे ज्येष्ठ नेते ठरवतील, असंही गोऱ्हे यांनी स्पष्ट केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.