नवी दिल्ली, 2 नोव्हेंबर : टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाची (Team India) कामगिरी निराशाजनक झाली आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवामुळे टीम इंडियाचं सेमी फायनलला पोहोचणं अवघड झालं आहे. भारताच्या या खराब कामगिरीनंतर काही विकृतांनी विराट कोहलीची (Virat Kohli) मुलगी वामिकालाही धमकी दिली. यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ट्वीट करून विराट कोहलीला पाठिंबा दिला आहे. या लोकांमध्ये द्वेष भरला आहे, त्यांना माफ कर, असं ट्वीट राहुल गांधींनी केलं आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताच्या दोन पराभवांनंतर कर्णधार विराट कोहली आणि त्याच्या कुटुंबाला धमकी मिळत आहे. काही विकृतांनी तर सोशल मीडियावर विराटच्या मुलीला बलात्कार आणि हत्येची धमकी दिली. या घृणास्पद कृत्यानंतर अनेकजण विराटच्या समर्थनासाठी पुढे आले आहेत.
Dear Virat,
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 2, 2021
These people are filled with hate because nobody gives them any love. Forgive them.
Protect the team.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचं समर्थन करत एक ट्वीट केलं आहे. ‘प्रिय विराट, या लोकांमध्ये द्वेष भरला आहे, कारण त्यांच्यावर कोणीच प्रेम करत नाही. त्यांना माफ कर आणि टीमचं रक्षण कर,’ असं ट्वीट राहुल गांधींनी केलं. याआधी पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर ट्रोलर्सनी मोहम्मद शमीवर फिक्सिंगचे आरोप केले, तसंच त्याचा धर्मही काढला. तेव्हाही राहुल गांधी मोहम्मद शमीच्या समर्थनासाठी पुढे आले होते. T20 World Cup : सचिन तेंडुलकर ते राहुल गांधी, मोहम्मद शमीसाठी दिग्गजांची बॅटिंग! महिला आयोग ऍक्शनमध्ये विराट कोहलीच्या कुटुंबाला धमकी आल्यानंतर दिल्ली महिला आयोगही ऍक्शनमध्ये आला आहे. महिला आयोगाने दिल्ली पोलिसांना नोटिस पाठवली आहे, यात विराटच्या मुलीला धमकी देणाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. ‘विराट आणि त्याची पत्नी अनुष्का शर्माच्या मुलीला धमकी देणं लाजिरवाणं आहे. अशी धमकी देणाऱ्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे. टीमने हजार वेळा देशाचं नाव उंचावलं, मग यावेळी पराभव झाला तर असा मूर्खपणा का?’ असा सवाल महिला आयोगाच्या अध्यक्षांनी विचारला. याप्रकरणी जर कोणालाच अटक झाली नसेल, तर आरोपीला अटक करण्यासाठी काय पावलं उचलण्यात येत आहेत? असा प्रश्न महिला आयोगाने दिल्ली पोलिसांना विचारला आहे. आयोगाने याचं उत्तर द्यायला दिल्ली पोलिसांना 8 नोव्हेंबरपर्यंतची वेळ दिली आहे.