मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /लेकीच्या हत्येसाठी बापाला डांबलं तुरुंगात,  3 वर्षांनी मुलगीच आली समोर

लेकीच्या हत्येसाठी बापाला डांबलं तुरुंगात,  3 वर्षांनी मुलगीच आली समोर

 मुलीच्या हत्येच्या आरोपासाठी 3 वर्षांचा कारावास भोगल्यानंतर मुलगीच  (Father in jail for daughter murder released after daught appeared before police) समोर आल्यामुळे वडिलांची सुटका झाली आहे.

मुलीच्या हत्येच्या आरोपासाठी 3 वर्षांचा कारावास भोगल्यानंतर मुलगीच (Father in jail for daughter murder released after daught appeared before police) समोर आल्यामुळे वडिलांची सुटका झाली आहे.

मुलीच्या हत्येच्या आरोपासाठी 3 वर्षांचा कारावास भोगल्यानंतर मुलगीच (Father in jail for daughter murder released after daught appeared before police) समोर आल्यामुळे वडिलांची सुटका झाली आहे.

लखनऊ, 2 नोव्हेंबर: मुलीच्या हत्येच्या आरोपासाठी 3 वर्षांचा कारावास भोगल्यानंतर मुलगीच  (Father in jail for daughter murder released after daught appeared before police) समोर आल्यामुळे वडिलांची सुटका झाली आहे. मुलीच्या हत्येच्या खोट्या आरोपाखाली 61 वर्षीय नागरिकाला तुरुंगात टाकण्यात आलं होतं. आरोपींनी पोलिसांशी संगनमत करून (Fake murder case against  father) मुलीच्या वडिलांना फसवल्याचं या घटनेतून समोर आलं आहे.

काय होतं प्रकरण?

उत्तर प्रदेशातील फर्रुखाबादमध्ये राहणाऱ्या लालाराम यांची मुलगी सोनी अचानक गायब झाली. मुलगी घरी न आल्याची तक्रार त्यांनी पोलीस ठाण्यात नोंदवली. मात्र मुलीचा काहीच पत्ता लागला नाही. वारंवार पोलीस ठाण्यात खेटे घालूनही मुलीचा काहीच थांगपत्ता लालाराम यांना मिळू शकला नाही. लालाराम यांनी नोंदवलेल्या तक्रारीत गावातील 3 तरुणांवर संशय व्यक्त केला होता.

पोलिसांनी बनवले खोटे पुरावे

पोलिसांनी हे प्रकरण निकाली काढण्यासाठी मुलीच्या वडिलांनाच आरोपी बनवले आणि त्यांनीच आपल्या मुलीचा खून केल्याचं भासवलं. आपल्याला मारहाण करून जबरदस्तीनं मुलीच्या हत्येची जबाबदारी घ्यायला भाग पाडलं, असा दावा मुलीच्या वडिलांनी न्यायालयात केला आहे. आरोपीच्या साथीनं खोटे पुरावे सादर करत लालाराम यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

मुलगी आली समोर

काही दिवसांपूर्वी ज्या मुलीच्या हत्येचा आरोप लालाराम यांच्यावर आहे, ती मुलगीच समोर आली आणि तिने पोलीस अधीक्षकांना आपण जिवंत असल्याचं सांगितलं. त्यानंतर पोलिसांच्या तपासावर गंभीर आक्षेप घेत न्यायालयाने लालाराम यांनी सुटका केली.

हे वाचा- चीनने बचावासाठी, कोळंबी आणि गोमांसाला Corona साठी धरले जबाबदार

कोर्टानं ओढले ताशेरे

जनतेला न्याय देण्याची आणि निरपराध लोकांच्या रक्षणाची शपथ घेतलेल्या पोलिसांनीच खोटे पुरावे सादर करत एका निरपराध व्यक्तीला तुरुंगावास घडवल्याबद्दल न्यायालयाने कडक ताशेरे ओढले आहेत. कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलिसांवरच गुन्हे दाखल करण्याचे आदेश कोर्टानं दिले आहेत. पोलिसांनीच केलेल्या खोट्या कारवाईमुळे एका व्यक्तीला विनाकारण 3 वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागल्यामुळे सामान्यांमधून पोलिसांबद्दल संताप व्यक्त होत आहे.

First published:

Tags: Crime, Murder, Uttar paredesh