जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / ठाकरे गटाची पंकजा मुंडे यांना खुली ऑफर; देवेंद्र फडणवीस म्हणाले, कुठल्याही परिस्थिती..

ठाकरे गटाची पंकजा मुंडे यांना खुली ऑफर; देवेंद्र फडणवीस म्हणाले, कुठल्याही परिस्थिती..

ठाकरे गटाची पंकजा मुंडे यांना खुली ऑफर

ठाकरे गटाची पंकजा मुंडे यांना खुली ऑफर

Maharashtra News: ठाकरे गटाने पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांना शिवसेनेत येण्यासाठी ऑफर दिल्याचे सांगितले जात आहे.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 13 जानेवारी : गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पार्टीच्या महिला नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्यांनी अनेकदा आपण पक्षात नाराज नसल्याचं म्हटलं आहे. पण पुन्हा-पुन्हा त्यांच्या नाराजीचा मुद्दा महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत येतो. मध्यंतरी पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून ऑफर असल्याचे सांगितले जात असतानाच शिवसेना ठाकरे गटातील आमदाराने पंकजा मुंडे यांना शिवसेनेत येण्याबाबत ऑफर दिल्याचे बोलले जात आहे. पंकजा मुंडे शिवसेनेत आल्या तर स्वागतच आहे, असे या आमदाराने म्हटले आहे. यावर आता भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा खोट्या : देवेंद्र फडणवीस भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना सातत्याने डावलले जात असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतात. तसेच पंकजा मुंडे भाजपला सोडचिठ्ठी देऊ शकतात, याबाबतही राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढवले जातात. मध्यंतरी पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून ऑफर असल्याचे सांगितले जात असतानाच शिवसेना ठाकरे गटातील आमदाराने पंकजा मुंडे यांना शिवसेनेत येण्याबाबत ऑफर दिल्याचे बोलले जात आहे. पंकजा मुंडे शिवसेनेत आल्या तर स्वागतच आहे, असे या आमदाराने म्हटले आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे भाजप सोडणारही नाहीत आणि मातोश्रीवरही जाणार नाहीत, असं वक्तव्य केलं आहे. तर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीनी देखील पंकजाताई भाजपमध्ये अत्यंत खुश असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. वाचा - ‘स्वतःला विकलं तेवढं पुरे, मुंबईला विकू नका..’ आदित्य ठाकरेंचा थेट मुख्यमंत्र्यांना हल्ला ठाकरे गटातून पंकजा मुंडे यांना ऑफर पंकजा मुंडे या राज्यातील महत्त्वाच्या नेत्या आहेत. त्यांच्यावर भाजपमध्ये अन्याय होतोय. आपण सर्वच ते पाहत आहोत. अर्थात ही त्यांची पक्षांतर्गत बाब आहे. त्यावर आम्ही काही बोलणार नाही. त्यांच्या कर्तृत्वाची नेहमीच आम्हाला कदर असेल. पण त्यांच्यावर अन्याय होत असेल आणि त्यांना जर शिवसेनेत यायचे असेल तर आम्ही त्यांचे स्वागतच करू, असे सुनील शिंदे यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सुनील शिंदे यांनी केली आहे. राज्याचे गृहमंत्री वारंवर कायदा आणि सुव्यवस्थेचा हवाला देत असतात. कुणाचाही मुलाहिजा बाळगणार नाही असे सांगतात. आता कर्तव्य पाळण्याची वेळ आली आहे. त्यांनी कर्तव्यात कसूर करू नये ही मुंबईकराची इच्छा आहे, असा टोला सुनील शिंदे यांनी यावेळी लगावला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात