मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

पुण्यातील तरुणीला आईच्या Relationshipचा लागला सुगावा; बॉयफ्रेंडच्या मदतीनं उकळले लाखो रुपये

पुण्यातील तरुणीला आईच्या Relationshipचा लागला सुगावा; बॉयफ्रेंडच्या मदतीनं उकळले लाखो रुपये

(File Photo)

(File Photo)

Crime in Pune: पुण्यातील एका 21 वर्षीय तरुणीनं आपल्या आईचे प्रियकरासोबतचे फोटो व्हायरल (Mother's Obscene Photo With her Boyfriend ) करण्याची धमकी देत लाखो रुपये उकळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

पुणे, 05 सप्टेंबर: पुण्यातील एका 21 वर्षीय तरुणीनं आपल्या आईचे प्रियकरासोबतचे फोटो व्हायरल (Mother's Obscene Photo With her Boyfriend ) करण्याची धमकी देत लाखो रुपये उकळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका व्यक्तीचं आपल्या आईसोबत प्रेमसंबंध (Mother's Relationship) सुरू असल्याचा सुगावा लागल्यानंतर आरोपी तरुणीनं आपल्या आईचं व्हॉट्सअॅप हॅक (Hacked Whatsapp) केलं आहे. यानंतर आईचे आणि तिच्या प्रियकराचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत 15 लाख रुपयांची खंडणी (Demand Rs 15 Lakh Ransom) मागणी केली होती. पण आईच्या प्रियकरानं पोलिसांत तक्रार दिल्यानं मुलीचा भांडाफोड झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तरुणीसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

नेमकी घटना काय आहे?

तक्रारदार व्यक्तीचे आरोपी तरुणीच्या 40 वर्षीय आईसोबत प्रेमसंबंध सुरू होते. पण काही दिवसांनी आरोपी तरुणीला याचा सुगावा लागला. आपल्या आईचं परपुरुषासोबतचं प्रेम प्रकरण उघडकीस आणण्यासाठी मुलीनं स्वतःच्या आईचं व्हॉट्सअॅप हॅक केलं. त्यावेळी तिला दोघांत प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली. सोबतच तिला आपल्या आईचे प्रियकरासोबतचे काही फोटो आणि व्हिडीओ देखील मिळाले.

हेही वाचा-लग्नाचं आमिष दाखवून युवतीचं लैंगिक शोषण; भाजप खासदाराच्या मुलाचं धक्कादायक कृत्य

हेच फोटो आणि व्हिडीओ आरोपी तरुणीनं आपला प्रियकर मिथुन गायकवाड (वय-29) याला दाखवले. येथूनच खंडणीचा प्रकार सुरू झाला. आरोपींनी तक्रारदार व्यक्तीला संपर्क साधून, दोघांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच बदनामी टाळायची असेल तर पंधरा लाख रुपये द्या, अशी मागणी आरोपींनी केली. दबावाला बळी पडून तक्रारदारानं 2 लाख 60 हजार रुपये इतकी रक्कम आरोपींना वेळोवेळी दिली.

हेही वाचा-दोन मुलांवर प्रेम करणं मुलीच्या अंगाशी, Boyfriendकडून अश्लील फोटो व्हायरल

पण त्यांची पैशांची मागणी काही कमी होत नव्हती, त्यामुळे आईच्या प्रियकरानं याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर तक्रारदारानं उर्वरित पैसे घेण्यासाठी आरोपींना दगडूशेठ गणपती मंदिराजवळ बोलवलं. याठिकाणी पैसे घेण्यासाठी आलेल्या मिथुन गायकवाड याला पोलिसांनी 1 लाख रुपये स्विकारताना रंगेहाथ पकडलं आहे. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्यानं आपल्या प्रेयसीसोबत मिळून हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं दोघांनाही अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Pune