मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

लग्नाचं आमिष दाखवून युवतीवर लैंगिक अत्याचार; भाजप खासदाराच्या मुलाचं धक्कादायक कृत्य

लग्नाचं आमिष दाखवून युवतीवर लैंगिक अत्याचार; भाजप खासदाराच्या मुलाचं धक्कादायक कृत्य

Crime in Wardha: भाजपच्या बड्या नेत्याच्या मुलानं वर्धा शहरातील रहिवासी असणाऱ्या युवतीला लग्नाचं आमिष दाखवून (Lure of marriage) तिच्यावर लैंगिक अत्याचार (Sexual Abuse) केल्याची घटना उघडकीस आली आहे.

Crime in Wardha: भाजपच्या बड्या नेत्याच्या मुलानं वर्धा शहरातील रहिवासी असणाऱ्या युवतीला लग्नाचं आमिष दाखवून (Lure of marriage) तिच्यावर लैंगिक अत्याचार (Sexual Abuse) केल्याची घटना उघडकीस आली आहे.

Crime in Wardha: भाजपच्या बड्या नेत्याच्या मुलानं वर्धा शहरातील रहिवासी असणाऱ्या युवतीला लग्नाचं आमिष दाखवून (Lure of marriage) तिच्यावर लैंगिक अत्याचार (Sexual Abuse) केल्याची घटना उघडकीस आली आहे.

  • Published by:  News18 Desk

वर्धा, 05 सप्टेंबर: भाजपच्या बड्या नेत्याच्या मुलानं वर्धा शहरातील रहिवासी असणाऱ्या युवतीला लग्नाचं आमिष दाखवून (Lure of marriage) तिच्यावर लैंगिक अत्याचार (Sexual Abuse) केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपी खासदार पुत्रानं (Son of BJP MP) आपल्याला लग्नाचं आमिष दाखवून अत्याचार केला आहे. तसेच अनेकदा शिवीगाळ करत मारहाण (Abuse and Beat) केल्याचा आरोपही पीडित तरुणीनं केला आहे. याप्रकरणी पीडित तरुणीनं नागपूर येथील विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे तक्रार केली आहे. हे प्रकरण आता कौटुंबीक न्यायालयात दाखल केलं असून पोलीस या  घटनेचा तपास करत आहेत.

पंकज तडस (Pankaj Tadas) असं संशयित आरोपीचं नाव असून तो भाजप खासदार रामदास तडस (BJP MP Ramdas Tadas) यांचा पुत्र आहे. खासदार पूत्र पंकजनं कोऱ्या कागदांवर सह्या घेऊन बनावट विवाहाचं (Fake Marriage) चित्र उभं करत आपली फसवणूक केली, असा आरोप पीडित तरुणीनं केला आहे. पण खासदार रामदास तडस यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच पंकजनं तक्रारदार तरुणीसोबत विवाह केल्याचा दावा केला आहे. हे प्रकरण सध्या कौटुंबीक न्यायालयात असून तक्रारदार तरुणीला आपल्या परिवारानं कसलाही त्रास दिला नसल्याचं तडस यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा-...अन् कंपनीच्या खजिन्यावरच मारला डल्ला; तरुणानं BMW कार घेत उधळले करोडो रुपये

लोकमतनं दिलेल्या वृत्तानुसार, खासदार पुत्र पंकज तडस याचं काही दिवसांपूर्वी वर्धा येथील रहिवासी असणाऱ्या एका तरुणीसोबत प्रेम संबंध जुळले होते. यानंतर दोघांनीही 6 ऑक्टोबर 2020 रोजी विवाह केला होता. त्यानंतर पंकजसह पीडित तरुणी वर्ध्यात राहायला गेले होते. यानंतर संबंधित तरुणी देवळी येथी तडस यांच्या घरीही राहायला गेली होती. पण कालांतरानं दोघांत वितुष्ट आल्यानं हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं आहे. याप्रकरणी पीडित तरुणीनं नागपूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षकांकडे तक्रार केली आहे.

हेही वाचा-अपहरण करून बाळाला परराज्यात विकलं; 48तासांत मुंबई पोलिसांनी घडवली मायलेकराची भेट

पीडितेच्या मते, संशयित आरोपी पंकजनं बनावट विवाहाचं चित्र उभं केलं आहे. रोशन ठाकूर नावाच्या तरुणाच्या माध्यमातून पंकजनं शिव वैदिक विवाह संस्थेचं कोरं प्रमाणपत्र आणलं होतं. त्यावर माझ्या सह्या घेतल्या. शिवाय काही कोऱ्या कागदांवर देखील सह्या घेण्यात आल्या आहेत. तसेच विविध कारणं देऊन पंकज मला फ्लॅटवर बोलवायचा पण मी रितसर लग्न केल्याशिवाय एकत्र राहण्याला नकार दिला होता. पण त्यानं लग्नाचं आमिष दाखवून सोबत राहायला भाग पाडलं.

हेही वाचा-अकोल्यात महिला तलाठ्याचा प्रताप, मोबाइलवर मारला डल्ला; CCTVमध्ये पकडली गेली चोरी

पंकजनं तगादा लावल्यानंतर आपण दोन महिन्यांनी फ्लॅटवर गेले, असंही पीडितेनं तक्रारीत म्हटलं आहे. पण काही दिवसांनी पंकज मला मारझोड करू लागला. शिव्या देऊ लागला. तू ठेवलेली बाई आहेस. मी म्हणेल तसंच वागायचं असं सांगून धमकावू लागला. आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून आपण पोलिसांत तक्रार देत असल्याचं तक्रारदार तरुणीनं म्हटलं आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

First published:

Tags: BJP, Crime news, Rape