तमिळनाडू, 04 सप्टेंबर: सध्या सोशल मीडिया हा सगळ्यांच्याच आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. तरुणपिढी तर सतत तिथं सक्रिय असते. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात अनेक गोष्टीही घडतात कधी त्या चांगल्या असतात तर कधी वाईट. सोशल मीडियावरची मैत्रीही (Friendship on Social Media) अनेकांना प्रत्यक्ष आयुष्यात महागात पडल्याचं तुम्ही अनेक बातम्यांमध्ये वाचलं असेल. अशीच एक सोशल मीडियाशी संबंधित घटना तमिळनाडूतील दिंडीगुल इथं घडली आहे. इथं राहणाऱ्या एका तरुणीने सतीश (20) आणि अरुण या दोन तरुणांनी आपले अश्लील फोटो (Intimate photos) सोशल मीडियावर प्रसिद्ध केल्याची तक्रार दिंडीगुलजवळच्या नीलकोट्टाई इथं असलेल्या संपूर्ण महिलांच्या पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर पोलिसांनी तिच्या तक्रारीवरून सतीश, अरूण तसंच इतर दोघांविरुद्ध या प्रकाराशी संबंधित कायद्यांतर्गत एफआयआर (FIR) दाखल केला अशी माहिती पोलिसांनी दिली. याबाबतचं वृत्त टाइम्स नाऊ न्यूजनं दिलं आहे. पोलिसांनी आरोपी सतीश आणि नेल्सन यांना अटक केली असून अरुण आणि दुसऱ्या व्यक्तीचा शोध ते घेत आहेत. या प्रकरणाबाबत या मुलीने पोलिसांना सविस्तर माहिती दिली. त्यानुसार नीलकोट्टाईजवळच्या एका गावात ही मुलगी राहते. ती कॉलेजच्या शेवटच्या वर्षात शिकते. तिचं आणि सतीश यांचं एकमेकांवर प्रेम होतं. त्यामुळे तिने तिचे अश्लील फोटो सतीशशी शेअर केले होते.पण कोरोनाकाळात लॉकडाऊन (Covid-19 Lockdown) लागला आणि या दोघांमधला संपर्क कमी झाला. त्यामुळे त्यांच्यात दुरावा निर्माण झाला. त्याचवेळी या मुलीने सोशल मीडियावर अरुण नावाच्या मुलाशी सूत जुळवलं. तिला तो आवडायला लागला म्हणून या मुलीने तिचे अश्लील फोटो अरुणलाही पाठवले.
‘गोमूत्र प्यायल्यास संसर्ग बरा होतो’; साध्वी प्रज्ञा यांचा नवा अजब दावा
दरम्यानच्या काळात अरुण आणि सतीश यांची भेट झाली आणि त्यांच्या लक्षात आलं की ही मुलगी दोघांशीही प्रेमाचं नाटक करत आहे. त्यामुळे त्या तिघांमध्ये खटके उडायला लागले. त्या रागातून सतीश आणि अरुण यांच्याकडे असलेले या मुलीचे अश्लील फोटो त्यांनी सोशल मीडियावर अपलोड केले आणि ते व्हायरल झाले, असं टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तात म्हटलं आहे.
आपले अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं लक्षात आल्यावर या मुलीने पोलिसांत तक्रार दिल्याचं पोलिसांनी सांगितलं.
पाकिस्तानचा नवा कट! हिंदूंची लोकसंख्या मुद्दाम कमी दाखवली? काय आहे प्रकरण?
एका आठवड्यापूर्वी दिल्ली पोलिसांनी दिलशाद गार्डन भागात राहणाऱ्या 21 वर्षीय जतीन भारद्वाज या तरुणाला अटक केली होती. तो मोबाइलवरच्या टॉक लाइफ अप्लिकेशनच्या माध्यमातून परदेशी निराशाग्रस्त किंवा आर्थिक अडचणीत सापडलेल्या महिलांना ब्लॅकमेल करायचा. जतीन इंडोनेशियातील एका महिलेला ऑनलाईन न्यूड फोटो शेअर करायला भाग पाडलं आणि त्यानंतर तो तिला ब्लॅकमेल करत होता. यासंबंधीची तक्रार इंडोनेशियातील त्या अशी तक्रार त्या महिलेने पोलिसांत दिली होती त्यामुळे पोलिसांनी जतीनला अटक केली होती.