• Home
  • »
  • News
  • »
  • pune
  • »
  • महालक्ष्मी देवीला तब्बल 16 किलोची सोन्याची साडी, PHOTO आला समोर

महालक्ष्मी देवीला तब्बल 16 किलोची सोन्याची साडी, PHOTO आला समोर

'दक्षिण भारतातील कारागिरांनी ही सोन्याची साडी साकारली आहे. आकर्षक नक्षीकाम असलेल्या या साडीतील देवीचे मनोहारी रुप पाहण्याकरीता दरवर्षी भाविकांची मोठी गर्दी होते'

  • Share this:
पुणे, 25 ऑक्टोबर : दसऱ्याच्या (Dasra 2020) निमित्ताने दरवर्षी सारसबागेसमोर असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरातील देवीला मंदिर (mahalaxmi mandir pune)प्रशासनाकडून सोन्याची साडी परिधान केली जाते. कोरोनामुळे मंदिरं बंद असले तरी देखील सोन्याची साडी (Gold saree )परिधान केलेल्या देवीचे सुवर्णवस्त्रातील मनोहारी रुपाचे दर्शन भाविकांनी ऑनलाइन पद्धतीने घेता येणार आहे. वर्षभरात केवळ दोन वेळा म्हणजेच दसरा आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही साडी देवीला नेसविण्यात येते, त्यामुळे या दिवसाला महत्व आहे. शुद्ध सोन्यात बनवलेली सुमारे 16 किलो वजनाची ही साडी आहे. 'दक्षिण भारतातील कारागिरांनी ही सोन्याची साडी साकारली आहे. आकर्षक नक्षीकाम असलेल्या या साडीतील देवीचे मनोहारी रुप पाहण्याकरीता दरवर्षी भाविकांची मोठी गर्दी होते. मात्र, यंदा मंदिर बंद असल्याने शेकडो भाविकांनी ऑनलाइन पद्धतीने देवीचे दर्शन घेतले. यंदाचा उत्सवाचा खर्च कोरोनाकाळात सेवा दिलेल्या व समाजातील गरजू घटकांसाठी करण्यात आला, अशी माहिती मंदिराचे प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल यांनी दिली. चीन,CAA ते तुकडे-तुकडे गँग मोहन भागवतांच्या भाषणातले वाचा महत्त्वाचे मुद्दे महालक्ष्मी osbrसमोर नवरात्र उत्सवात नऊ दिवस दररोज सुमारे 2000 ते 2500 फळांचा नैवेद्य दाखविण्यात आला. तसेच दररोज वेगवेगळ्या फळांच्या या नैवेद्याचा प्रसाद पुण्यातील विविध कोविड सेंटर्सना पाठविण्यात आला. पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. या माध्यमातून संपूर्ण उत्सवात सुमारे 20 हजार फळे कोविड सेंटर्समधील रुग्ण व कर्मचाऱ्यांना देण्यात आली. तसेच विविध प्रकारचे यज्ञ-याग, पीएमपी कर्मचा-यांना पीपीई किट आणि कोरोना योद्ध्यांच्या हस्ते पूजन असे नानाविध कार्यक्रम देखील उत्सवात करण्यात आले. घरखरेदी होईल स्वस्त! केवळ 3.99 टक्के व्याजदराने ही कंपनी देत आहे गृहकर्ज महालक्ष्मी मंदिराच्या वेबसाईट www.mahalaxmimandirpune.org यावरुन तसेच मंदिराची वेबसाइट, फेसबुक पेज  व  युट्यूब तसंच स्थानिक केबलवर भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
Published by:sachin Salve
First published: