मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

राम मंदिर, चीन CAA ते तुकडे-तुकडे गँगपर्यंत मोहन भागवतांच्या भाषणातील वाचा महत्त्वाचे मुद्दे

राम मंदिर, चीन CAA ते तुकडे-तुकडे गँगपर्यंत मोहन भागवतांच्या भाषणातील वाचा महत्त्वाचे मुद्दे

नागपुरातील राष्ट्रीय स्वयं सेवक संघाने देखील 50 जणांच्या उपस्थितीत यंदा रेशीमबागऐवजी सभागृहात सोहळा करण्यात आला आहे.

नागपुरातील राष्ट्रीय स्वयं सेवक संघाने देखील 50 जणांच्या उपस्थितीत यंदा रेशीमबागऐवजी सभागृहात सोहळा करण्यात आला आहे.

नागपुरातील राष्ट्रीय स्वयं सेवक संघाने देखील 50 जणांच्या उपस्थितीत यंदा रेशीमबागऐवजी सभागृहात सोहळा करण्यात आला आहे.

  • Published by:  Kranti Kanetkar

नागपूर, 25 ऑक्टोबर : विजयादशमीवर यंदा कोरोनाचं संकट आहे. त्य़ामुळे अगदी साध्या आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत राजकीय मेळावे आणि सोहळे पार पडत आहेत. नागपुरातील राष्ट्रीय स्वयं सेवक संघाने देखील 50 जणांच्या उपस्थितीत यंदा रेशीमबागऐवजी सभागृहात सोहळा करण्यात आला आहे. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांनी शस्त्रपूजन केलं आणि संवादही साधला.

यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य देखील केलं आहे. कोरोना, राम मंदिर, CAA, भारत-चीनमधील तणाव यासोबतच पर्यावर जपण्यासाठी काय करणं गरजेचं आहे अशा अनेक विषयांना त्यांनी स्पर्श केला त्यापैकीच त्यांच्या भाषणातील काही महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊया

-देशातून कलम 370 हटवलं -सरसंघचालक

- 'रामजन्मभूमीचा निर्णय ऐतिहासिक आहे. हा राम मंदिराचा निर्णय देशानं संयमानं स्वीकारला'

-'सीएएमुळे कोणाचंही नागरिकत्व धोक्यात नाही'

-'सरकारनं योग्य उपाय योजल्याचा फायदा झाला'

-'संपूर्ण जगावर कोरोनाचं सावट , कोरोनाविरोधात जनतेनं सावधानता बाळगली. कोरोनामुळे अनेक विषय मागे -सरसंघचालक

-सर्वच स्तरांतून कोरोनाविरोधात मोठी लढाई पण ही लढाई सर्वांनी एकत्र येऊन लढली.

-कोरोनामुळे अनेकांचा रोजगार केला, पण सर्वांना रोजगार आहेत असं चित्र नाही. रोजगाराच्या नव्या संधी शोधाव्या लागतील.

-कोरोना संकटात समाजाचं नवं रूप दिसलं, कोरोना अजून पूर्णपणे संपलेली नाही त्याला हरवण्याचा संकल्प करूया

-चीननं भारतासोबत जाणीवपूर्वक वाद निर्माण केला. चीननं सीमेवर घुसखोरी करून वाद पेटवला. भारताच्या प्रत्युत्तरानं चीनला धक्का बसला.

-भारताला चीनपेक्षा सामर्थ्यवान बनावं लागेल. निवडणूक ही एक स्पर्धा आहे -सरसंघचालक

-निवडणुकांमध्ये वैचारिक लढा हवा, युद्ध नको. सत्तेसाठी संघर्ष करताना विवेक पाळावा

-सत्तेसाठी सामाजिक संघर्ष करणं योग्य नाही. धर्मनिरपेक्षतेचं नाव पुढे करून समाज तोडू नका

-काही लोक स्वार्थासाठी जनतेत फूट पाडतात. संघटनेविषयी चुकीची माहिती पसरवली जाते. संघाविषयी गैरसमज पसरवला जातो -सरसंघचालक

-हिंदू शब्दावरून वाद निर्माण केला जातो. हिंदू कोणत्याही पंथाचा नाही -सरसंघचालक

-हिंदू हा सर्वसमावेशक, एकात्मता दर्शवणारा शब्द. वैविध्यतेच्या माध्यमातून फूट पाडण्याचा प्रयत्न

First published:

Tags: Nagpur, Rss mohan bhagwat