टाटा रिअल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चरचे एमडी आणि सीईओ संजय दत्त यांच्या मते कोरोना काळात रिअल इस्टेट क्षेत्र मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले आहे. मात्र आता सुधारणांचे काही संकेत दिसत आहेत. या क्षेत्राला दिलासा देण्यासाठी सरकार आणि RBI ने काही महत्त्वाची पावलं उचलली आहेत. आता खाजगी क्षेत्रांनी घर खरेदीदारांची मदत करणे गरजेचे आहे.