मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

पुणे: रेल्वे रोखण्यासाठी भामट्यांनी तोडल्या सिग्नलच्या वायरी; कोणार्क एक्स्प्रेसवर दरोडा

पुणे: रेल्वे रोखण्यासाठी भामट्यांनी तोडल्या सिग्नलच्या वायरी; कोणार्क एक्स्प्रेसवर दरोडा

Crime in Pune: दरोडेखोरांनी रेल्वे रोखण्यासाठी चक्क सिग्नलच्या वायरी तोडून (Cut signals wire) कोणार्क एक्स्प्रेसवर दरोडा टाकला (Robbery in konark express) आहे.

Crime in Pune: दरोडेखोरांनी रेल्वे रोखण्यासाठी चक्क सिग्नलच्या वायरी तोडून (Cut signals wire) कोणार्क एक्स्प्रेसवर दरोडा टाकला (Robbery in konark express) आहे.

Crime in Pune: दरोडेखोरांनी रेल्वे रोखण्यासाठी चक्क सिग्नलच्या वायरी तोडून (Cut signals wire) कोणार्क एक्स्प्रेसवर दरोडा टाकला (Robbery in konark express) आहे.

  • Published by:  News18 Desk

पुणे, 27 ऑक्टोबर: काही दिवसांपूर्वी इगतपुरी-कसारा रेल्वे स्थानकांदरम्यान पुष्पक एक्स्प्रेसवर आठ जणांनी दरोडा (Robbery in Pushpak express) टाकला होता. दरोडेखोरांनी रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोबाइल, रोकड आणि दागिने असा ऐवज लुटला होता. दरोडा टाकल्यानंतर आरोपींनी रेल्वेतून प्रवास करणाऱ्या एका महिलेवर सामूहिक बलात्कार केला होता. ही घटना ताजी असताना, रेल्वे लुटीची आणखी एक घटना उघडकीस आली आहे. यावेळी आरोपींनी रेल्वे रोखण्यासाठी चक्क सिग्नलच्या वायरी तोडून (Cut signals wire) कोणार्क एक्स्प्रेसवर दरोडा टाकला (Robbery in konark express) आहे.

दरोडेखोरांनी सिग्नलच्या वायरी तोडून रेल्वेतून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांचा जीव धोक्यात घातला आहे. चोरट्यांनी खिडकीत बसलेल्या दोन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावल्या आहेत. ही घटना पुणे दौंड रेल्वेमार्गावरील नानविज फाट्याजवळ घडली आहे. रेल्वे सिग्नलच्या वायरी कापल्यामुळे सिग्नल न मिळाल्याने रेल्वे नानविज फाट्याजवळ थांबली होती. दरम्यान अंधारातून आलेल्या तीन दरोडेखोरांनी दोन महिलांच्या गळ्यातील सव्वा लाखांचे मंगळसूत्र आणि सोनसाखळी हिसकावली आहे.

हेही वाचा-चायनीज गाडीवरचा गल्ला पळवला, पाठलाग करून तरुणाची भर रस्त्यावर केली हत्या

दरम्यान बहिणीच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावल्याने चोरट्यांचा पाठलाग करण्यासाठी रेल्वेतून खाली उतरलेला तरुण चोरट्यांच्या हल्ल्यात जखमी झाला आहे. विनायक श्रीराम असं चोरट्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे. लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी रात्री साडेसात वाजता कोणार्क एक्स्प्रेस पुण्याहून दौंडकडे रवाना झाली होती. रात्री पावणे नऊच्या सुमारास कोणार्क एक्स्प्रेस नानविज फाट्याजवळ पोहोचली होती.

हेही वाचा- इगतपुरी-कसारा स्थानकांदरम्यान धावत्या रेल्वेत तरुणीवर अत्याचार; पुष्पक एक्स्प्रेसमधील धक्कादायक प्रकार

पण पुढे मार्गक्रमण करण्यासाठी सिग्नल न मिळाल्याने कोणार्क एक्स्प्रेस नानविज फाट्याजवळच थांबली. यावेळी अंधारातून आलेल्या तीन दरोडेखोरांनी एस-4 आणि एस-1 बोगीमध्ये खिडकीत बसलेल्या दोन महिलांच्या गळ्यातील एकूण 11 तोळे सोनं भामट्यांनी हिसावलं आणि अंधारातून पळ काढला. यावेळी बहिणीच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावल्याने रेल्वेतून खाली उतरलेल्या एका तरुणाला चोरट्यांनी रेल्वे रुळावरील दगडांच्या साह्याने जखमी केलं आहे. याप्रकरणी लोह मार्ग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Gold robbery, Pune, Train