• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • इगतपुरी-कसारा स्थानकांदरम्यान धावत्या रेल्वेत तरुणीवर अत्याचार; पुष्पक एक्स्प्रेसमधील धक्कादायक प्रकार

इगतपुरी-कसारा स्थानकांदरम्यान धावत्या रेल्वेत तरुणीवर अत्याचार; पुष्पक एक्स्प्रेसमधील धक्कादायक प्रकार

अचानक रेल्वेत शिरलेल्या सात ते आठ दरोडेखोरांनी धावत्या ट्रेनमध्येच एका 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार (rape in running train) केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

  • Share this:
    कल्याण, 09 ऑक्टोबर: अचानक रेल्वेत शिरलेल्या सात ते आठ दरोडेखोरांनी धावत्या ट्रेनमध्येच एका 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार (rape in running train) केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. नराधमांनी रेल्वेतील 15 ते 20 प्रवाशांना लुटल्यानंतर (robbery in train) त्यांनी रेल्वेतून प्रवास करणाऱ्या 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार केला आहे. संबंधित धक्कादायक घटना लखनऊ-मुंबई पुष्पक एक्स्प्रेस ट्रेनमध्ये (lucknow mumbai pushpak express) घडली असून याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक (2 accused arrested) केली आहे. या घटनेनंतर महिला सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नेमकं काय घडलं? शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास सात ते आठ दरोडेखोरांनी अचानक लखनऊ-मुंबई पुष्पक एक्स्प्रेस ट्रेनमध्ये प्रवेश केला. यावेळी दरोडेखोरांनी 15 ते 20 प्रवाशांना लुटलं. आरोपींनी प्रवाशांकडून रोख रक्कमेसह किमती मुद्देमाल हिसकावून घेतला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये भितीचं वातावरण पसरलं होतं. प्रवाशांना लुटल्यानंतर दरोडेखोरांची नजर रेल्वेतून प्रवास करणाऱ्या 20 वर्षीय तरुणीवर पडली. हेही वाचा- पोलीस ठाण्यातही महिला असुरक्षित; पगार देण्याच्या बहाण्यानं बोलवलं अन्..., कोल्हापुरातील खळबळजनक घटना यानंतर नराधमांनी 20 वर्षीय तरुणीसोबत जबरदस्ती करत धावत्या ट्रेनमध्येच तिच्यावर बलात्कार केला. या संतापजन घटनेनंतर नराधमांनी घटनास्थळावरून पळ काढला. संबंधित संतापजनक प्रकार इगतपुरी ते कसारा रेल्वे स्थानकांदरम्यान घडला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कल्याण जीआरपीने दरोडा आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी दोन संशयित आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. हेही वाचा-कारखाना मालकांकडून विवाहितेसोबत विकृतीचा कळस; 31 वर्षांपासून देत होते नरक यातना दोन्ही आरोपींची कसून चौकशी केली जात आहे. तसेच अन्य आरोपींचा शोध घेतला जात आहे. या घटनेनंतर, रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलीस रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published: