पुणे, 11 जुलै : पुण्यात आज 'मुळशी पॅटर्न' चित्रपटाला लाजवेल अशी अंगाची थरकाप उडवणारी घटना कोंढव्यात घडली आहे. घरात घुसून टोळक्यांनी अट्टल गुन्हेगार पप्पू पडवळ याची निर्घृण हत्या केली आहे. कोयत्याने सपासप वार करून पप्पू पडवळला ठार मारण्यात आलं आहे.
घनश्याम उर्फ पप्पू पडवळ (रा. कोंढवा) असं खून झालेल्या गुन्हेगाराचं नाव आहे. पप्पू पडवळवर त्याच्यावर अनेक वेगवेगळे प्रकारचे गुन्हे दाखल आहे.
मोठी बातमी, मनसे नेत्याने घेतली इंदुरीकर महाराजांची भेट, बंद दाराआड केली चर्चा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी अज्ञात टोळक्याने घरात घुसून पप्पू पडवळवर कोयत्याने भीषण हल्ला केला. हा हल्ला इतका भीषण होता की, त्याचा चेहरा सुद्धा ओळखू येत नव्हता. एवढंच नाहीतर, त्याचा एक हात कोयत्याच्या हल्ल्यामुळे छाटला गेला. घरात रक्ताचा सडा पडला होता. पप्पू पडवळने जीव सोडल्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला.
पप्पू पडवळ हा रेकॉर्डवरील गुन्हेगार होता. याआधीही त्याच्यावर एका टोळीकडून हल्ला झाला होता. त्याच्यावर यापूर्वीही फायरिंग झालेले होते. तो आधी एक कार चालक होता. त्यानंतर त्याने व्याजाने पैसे देण्याचा व्यवसाय सुरू केला होता. त्याचे काही जणांसोबत पैशावरुन वादही होते.
बळीराजा दवाखान्यात, जनावरांसाठी खाकी गोठ्यात, पाहा हा VIDEO
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेतला असून पंचनामा केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.