बळीराजा दवाखान्यात, जनावरांसाठी खाकी वर्दीतला माणूस पोहोचला गोठ्यात, पाहा हा VIDEO

बळीराजा दवाखान्यात, जनावरांसाठी खाकी वर्दीतला माणूस पोहोचला गोठ्यात, पाहा हा VIDEO

या व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे या व्यक्तीच्या घरी किंवा शेतात जाण्यास गावातील कोणीही धजावत नव्हते.

  • Share this:

माढा, 11 जुलै : एका शेतकऱ्याला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्या वडील व पत्नी यांनाही शासकीय यंत्रणेने ताब्यात घेऊन हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. यामुळे घरात इतर कोणीही नसल्याने वस्तीवरील जनावरांचा चारापाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने टेंभुर्णी पोलिसांनी माणुसकी दाखवत शेतातील जनावरे, शेळ्या यांची चारापाण्याची सोय केली हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. टेंभुर्णी पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

माढा तालुक्यातील अकोले ( बु) येथील एका व्यक्तीचा अकलूज येथे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर या व्यक्तीवर पुणे येथे उपचार चालू होते. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांची यादी करण्यात आली. त्यानुसार या व्यक्तीचे वडील, पत्नी व नोकर यांनाही शासकीय यंत्रणेनं कोरोना चाचणी करण्यासाठी कुर्डुवाडी येथील शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.

यामुळे या व्यक्तीच्या घरात इतर कुणीही नसल्याने वस्तीवरील जनावरांच्या चारापाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. सदर व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे या व्यक्तीच्या घरी किंवा शेतात जाण्यास गावातील कोणीही धजावत नव्हते म्हणून माणुसकीच्या नात्याने मुक्या जनावरांची हेळसांड होऊ नये म्हणून टेंभुर्णी पोलिसांनी संबंधित व्यक्तीच्या शेतात जाऊन जनावरे, शेळ्या व कोंबड्या यांची चाऱ्या-पाण्याची सोय केली.

कोरोनावर वरदान ठरलेले 5 हजाराचे इंजेक्शन तब्बल 21 हजाराला, 2 जणांना अटक

सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला असून टेंभुर्णी पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

Published by: sachin Salve
First published: July 11, 2020, 12:21 PM IST
Tags:

ताज्या बातम्या