संगमनेर, 11 जुलै : प्रसिद्ध कीर्तनकार हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी कीर्तनातून वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले आहे. मनसेचे नेते अभिजित पानसे इंदोरीकर महाराजांच्या भेटीला पोहोचल्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
अभिजित पानसे यांनी संगमनेर तालुक्यातील ओझर गावी इंदोरीकर महाराजांच्या निवास्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी अभिजित पानसे आणि इंदुरीकर महाराज यांच्यामध्ये बंद दाराआड अर्धातास चर्चा झाली.
'एखाद्या छोट्या वाक्यावरून इतकी टोकाची भूमिका चुकीची आहे. इंदुरीकर महाराजांचे कार्य सुद्धा महत्वाचे आहे. अनथा मुलांसाठी शाळा चालवत आहे, समाज प्रबोधनाच मोठं काम विसरून चालेल का?' असा सवाल यावेळी अभिजित पानसे यांनी उपस्थितीत केला.
बळीराजा दवाखान्यात, जनावरांसाठी खाकी गोठ्यात, पाहा हा VIDEO
तसंच, 'ही इंदुरीकर महाराज यांची ही सदिच्छा भेट घेतली. सरकारने काय निर्णय घ्यावा हा त्यांचा प्रश्न आहे', असंही पानसे म्हणाले. तर या भेटीबाबत इंदुरीकर महाराजांनी मात्र काहीही बोलण्यास नकार दिला.
दरम्यान, मध्यतंरीच्या काळात या प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनीही कायदेशीर नोटीस बजावली होती. आता या नोटिसीला इंदुरीकर महाराज यांनी वकिलामार्फत उत्तर दिले आहे.
निवृत्ती महाराज देशमुख यांनी त्यांच्या वकिलांमार्फत अॅड कायदेशीर उत्तर पाठविले आहे. त्यामध्ये निवृत्ती महाराज देशमुख यांचे कोणी समर्थक नाही. निवृत्त महाराज कुठल्याही समर्थकांना ओळखत नाही. काही अज्ञात लोकांनी काही उद्योग केले असतील तर त्याला निवृत्ती महाराज जबाबदार नाही' अशी भूमिका निवृत्ती महाराजांकडून मांडण्यात आली.
लॉकडाउनच्या काळात आली शरद पवारांना आपल्या मित्राची आठवण, म्हणाले...
तसंच, 'निवृत्ती महाराज देशमुख यांनी आजपर्यंत कधीच कीर्तनातून महिलांना अपमानीत होईल किंवा महिलांचा अनादर होईल असे किंवा अंधश्रद्धा पसरेल असे वक्तव्य जाहीर कीर्तनातून कधीही केलेले नाही. त्यामुळे महाराजांनी महिलांची जाहीर माफी मागावी, असे निवृत्ती महाराज देशमुख यांना वाटत नाही किंवा माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही' असं स्पष्ट उत्तर या पत्राद्वारे निवृत्ती महाराज देशमुख यांनी दिले आहे.
इंदुरीकर महाराजांवर का झाला गुन्हा दाखल?
'अमुक तारखेला स्त्रीसंग केला तर मुलगा होतो व अमुक तारखेला स्त्रीसंग केला तर मुलगी होते. अमुक दिवसात स्त्रीसंग केला तर अपत्य बेवडी व भंगार जन्माला येते. अमुक दिवसात स्त्रीसंग केला तर अपत्य चांगले तयार होते' अशी आक्षेपार्ह व अंधश्रद्धा पसरविणारे आणि महिलांचा अपमान करणारी वक्तव्य निवृत्ती महाराज देशमुख यांनी जाहीर कीर्तनातून अनेकदा केली होती. त्यामुळे त्यांच्याविरोधात विरोधात दाखल असलेल्या फौजदारी खटल्यात संगमनेर, जिल्हा अहमदनगर येथील न्यायालयाने दखल घेऊन निवृत्ती महाराज देशमुख यांना ऑगस्ट महिन्यात न्यायालयात हजर होण्याचे आदेश दिले आहेत.