जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / ''कोविशिल्ड ही जगातील सर्वात स्वस्त लस'', सिरमचे सायरस पुनावाला यांचं वक्तव्य

''कोविशिल्ड ही जगातील सर्वात स्वस्त लस'', सिरमचे सायरस पुनावाला यांचं वक्तव्य

''कोविशिल्ड ही जगातील सर्वात स्वस्त लस'', सिरमचे सायरस पुनावाला यांचं वक्तव्य

Cyrus Poonawalla: आज पुण्यात डॉ. सायरस पूनावाला यांचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 13 ऑगस्ट: कोविशिल्ड (Covishield) ही जगातील सर्वात स्वस्त लस आहे. अतिशय माफक दरात आम्ही ही लस देत आहोत, असं सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष सायरस पुनावाला (Cyrus Poonawalla) यांनी म्हटलं आहे. आज पुण्यात डॉ. सायरस पूनावाला यांचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. पुण्यात (Pune Corona Vaccine)लस द्यायची इच्छा आहेच. पण मोदी सरकार उत्तर द्यायला तयार नसल्याचं पूनावाला यांनी म्हटलं आहे. कोव्हिशिल्ड लस आधी पुण्यात द्याव्या अशी मागणी केली आहे. मात्र त्यावर काही अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. पुण्यामध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण असल्याचं अहवालामधून दिसून आलं. त्यानंतर आम्ही पुण्याला सर्वाधिक लसींचा पुरवठा करण्याबद्दल विचारलं होतं. मात्र केंद्रातील मोदी सरकारने त्यावर काहीच उत्तर दिलं नाही, असं सायरस पुनावाला म्हणालेत. मी लस विकून पैसे बनवायला बसलो नाही मात्र लोकांनी लस घ्यावी. 18 वर्षाच्या आतील मुलांसाठी कोवशिल्डची परवानगी घेणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. लहान मुलांना घरूनच अभ्यास करू दे. लहान मुलांची लस यायला बराच वेळ लागणार. मुलांना एक- दोन वर्ष घरी बसूनच शिकू द्या, असंही ते म्हणालेत. तसंच दोन डोस झाल्यानंतर 6 महिन्यांनी तिसरा डोस -बुस्टर घ्यावा. नोवोवॅक्स लस 12 वर्षांच्या वरील मुलांना देता येईल, असं त्यांनी सांगितलं. अपघातग्रस्त युवक मागत राहिला मदत पण जनता VIDEO काढण्यातच बिझी; विरारमधील हृदयद्रावक घटना पूर्वी कोणत्याही परवानग्या मिळवताना नोकरशाहीचा खूप जाच व्हायचा आता कमी झाला असून याचं श्रेय मोदी सरकारला आहे, असंही पुनावाला यांनी म्हटलं आहे. पुढे ते म्हणाले, सिरमचा आजवरचा प्रवास खूप परिश्रमाचा आणि वेदनादायी राहिला आहे. मात्र आता पतिस्थिती बदलली आहे. कोरोनावरील लस बनवण्यासाठी आम्हाला सर्व प्रकारच्या परवानग्या तात्काळ मिळल्या. त्याचप्रमाणे सरकारकडून प्रोत्साहन देखील मिळाले आहे. धोका वाढला! राज्यात डेल्टा + प्लस व्हेरिएंटच्या मृतांची संख्या तीनवर कोविशिल्ड ही जगातील सर्वात स्वस्त लस आहे. अतिशय माफक दरात आम्ही ही लस देत आहोत, असंही यावेळी पुनावाला यांनी म्हटलं आहे. आम्ही अनेक लशी एका चहाच्या कपाच्या इतक्या नाममात्र किंमतीत दिल्या आहेत, असंही पुनावाला म्हणालेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात