मुंबई, 13 ऑगस्ट: राज्यात कोरोनाची (Maharashtra Corona) दुसरी लाट (Second Wave) ओसरत असताना एक मोठी धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईत (Mumbai) कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे (Delta Plus Variant) पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे. घाटकोपरमध्ये (Ghatkopar) 63 वर्षीय महिलेचा जुलै महिन्यात मृत्यू झाला होता. त्या महिलेच्या मृत्यूचा रिपोर्ट (Report) आता समोर आला आहे.
समोर आलेल्या रिपोर्टनुसार, महिलेचा मृत्यू हा डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे झाला होता. धक्कादायक म्हणजे, या महिलेनं लसीकरणाचे दोन्ही डोस घेतले होते. त्यानंतरही या महिलेचा डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्र राज्यात आतापर्यंत डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे तीन मृत्यू झाले आहेत. मुंबई, रायगड आणि रत्नागिरी असे प्रत्येक जिल्ह्यात एक मृत्यू झाल्याची माहिती समोर येतेय. 13 जूनला 80 वर्षीय एक महिलेचा रत्नागिरीमध्ये मृत्यू झाला होता. तर 69 वर्षीय व्यक्तीचा नागोठाणेमध्ये कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे बळी गेला.
अफगाणिस्तानात अमेरिका पुन्हा पाठवणार सैन्य?, जो बायडन यांचा मोठा निर्णय
राज्य सरकारकडून मुंबई पालिकेला सांगण्यात आलं होतं की, जीनोम सीक्वेंसिंगच्या तपासात समोर आलं आहे की, मुंबईत 7 लोकांना डेल्टा प्लस व्हेरिएंटची लागण झाली आहे. त्यानंतर बीएमसीनं या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांचं ट्रेसिंग सुरु केलं. ही महिला त्या सात लोकांमध्ये सहभागी होती.
बीएमसीचे अधिकारी जेव्हा महिलेच्या कुटुंबियांना भेटले त्यावेळी सांगण्यात आलं की, 27 जुलै रोजी महिलेचा मृत्यू झाला होता. त्या मृत महिलेत्या संपर्कात आलेले आणखी दोघं जण डेल्टा प्लस व्हेरिएंटची लागण झाली आहे.
धक्कादायक! Delta Plus चा मुंबईत पहिला बळी; कोरोना लस घेतल्यानंतरही मृत्यू
मुंबई आरोग्य विभागाच्या प्रमुख डॉ.मंगला गोमारे यांनी सांगितले की, 63 वर्षीय रुग्णाचा मृत्यू डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे झाला आहे. त्यानंतर महिलेच्या संपर्कात आलेल्या अन्य 6 जणांची तपासणी केली गेली. या तपासणीत 6 पैकी दोघांचा डेल्टा प्लस व्हेरिएंटची लागण झाली आहे. आता आणखी काही लोकांच्या चाचणीच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Mumbai