जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / अपघातग्रस्त युवक मागत राहिला मदत पण जनता VIDEO काढण्यातच बिझी; विरारमधील हृदयद्रावक घटना

अपघातग्रस्त युवक मागत राहिला मदत पण जनता VIDEO काढण्यातच बिझी; विरारमधील हृदयद्रावक घटना


मुंबईच्या विरार परिसरातील नारंगी फाटा येथील अपघात झालेलं ठिकाण...

मुंबईच्या विरार परिसरातील नारंगी फाटा येथील अपघात झालेलं ठिकाण...

Accident Viral Video: एका अवजड ट्रकनं दुचाकीस्वाराला धडक दिल्यानंतर, गंभीर जखमी झालेल्या तरुणाला मदत करायची सोडून काहीजण या घटनेचा व्हिडीओ बनवण्यात व्यस्त दिसत आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 13 ऑगस्ट: सध्या सोशल मीडियावर एक हृदय हेलावून टाकणारा व्हिडीओ व्हायरल होतं आहे. ज्यामध्ये एका अवजड ट्रकनं दुचाकीस्वाराला धडक दिल्यानंतर, गंभीर जखमी झालेल्या तरुणाला मदत करायची सोडून काहीजण या घटनेचा व्हिडीओ बनवण्यात व्यस्त दिसत आहेत. ट्रकच्या धडकेत अतिशय गंभीर जखमी झालेला युवक मदतीसाठी याचना करत होता. मात्र कुणाच्याही हृदयाला पाझर फुटला नाही. जवळपास  20-25 मिनिटे घटनास्थळी पडून राहिल्यानंतर एका तरुणानं अपघातग्रस्त तरुणाला रुग्णालयात उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. अपघातग्रस्त तरुणाचा जीव वाचला आहे. पण त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. पण तरुणाचा अपघात झाल्यानंतर काहीजणांनी त्याला रुग्णालयात दाखल करण्याऐवजी व्हिडीओ बनवल्यानं सोशल मीडियात संताप व्यक्त केला जात आहे. हेही वाचा- मासे खाताय? मग आधी हा VIDEO पाहाच, येथे माशांत आढळलेत लाल-पांढरे लांबलचक जंतू संबंधित घटना मुंबईच्या विरार परिसरातील नारंगी फाटा येथील आहे. याठिकाणी एका अवजड वाहनानं दुचाकी स्वाराला जोरदार धडक दिली होती. हा अपघात झाल्यानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला. तर अपघातग्रस्त तरुण घटनास्थळीच विव्हळत पडला होता. दरम्यान त्याठिकाणी अनेक लोकांनी अपघात पाहण्यासाठी गर्दी केली. पण मदतीसाठी कुणीही पुढे सरसावलं नाही.

जाहिरात

हेही वाचा- प्रेयसीचा खून केला अन् पत्नीच्या हत्येचंही फुटलं बिंग;साताऱ्यात दुहेरी हत्याकांड 20-25 मिनिटांनी नावेद खान नावाचा एका युवक देवदूत बनून याठिकाणी आला. त्यानं कोणताही विचार न करता, जखमी तरुणाला त्वरित रिक्षामध्ये घेऊन रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयात दाखल केल्यानंतर संबंधित जखमी तरुणाचा जीव वाचला आहे. पण त्याची प्रकृती अद्याप चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. पण नावेद खान नावाच्या युवकामुळे जखमी तरुणाचा जीव वाचला आहे. संबंधित व्हायरल व्हिडीओ दोन दिवसांपूर्वी असल्याचा दावा केला जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात