Home /News /pune /

Pune News: पुण्यातून आली चिंता वाढवणारी बातमी, कोरोनातून बरे झालेल्यांमध्ये आढळली नवी बुरशी

Pune News: पुण्यातून आली चिंता वाढवणारी बातमी, कोरोनातून बरे झालेल्यांमध्ये आढळली नवी बुरशी

पुण्यातून आली चिंता वाढवणारी बातमी; कोरोनातून बरे झालेल्यांमध्ये आढलली नवी बुरशी

पुण्यातून आली चिंता वाढवणारी बातमी; कोरोनातून बरे झालेल्यांमध्ये आढलली नवी बुरशी

After Coronavirus fungal infection in Pune: कोरोनाची लाट ओसरत असताना आता चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. पुण्यात रुग्णांमध्ये नवा फंगस आढळून आल्याचं वृत्त समोर आलं आहे.

    पुणे, 13 ऑक्टोबर : कोविडवर मात करुन बरे झालेल्या रुग्णांमध्ये साईड इफेक्टस (post covid affects) दिसून येत होते. हे पोस्ट कोविड म्हणजेच म्युकरमाकोसिस (mucormycosis (Black Fungus) होते. कोविड सोबतच म्युकरमाकोसिस आटोक्यात आलेला असतानाच आता पुण्यातून (Pune) चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. कारण, कोविडमुक्त झालेल्या पुण्यातील रुग्णांमध्ये आता नवीन बुरशी (fungus) आढळून आली आहे. गेल्या तीन महिन्यांत अशा प्रकारचे चार रुग्ण आढळून आले आहेत ज्यांच्यात एक वेगळीच बुरशी आढळून आली आहे. आता या नव्या बुरशीमुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. कोविडवर मात करुन पूर्ण बरे झालेल्या या रुग्णांना महिन्यानंतर सौम्य ताप आला. तसेच त्यांच्या पाठीच्या खालच्या भागात तीव्र वेदना सुरू झाल्याच्या तक्रारी आल्या. सुरुवातीला या रुग्णांना स्नायू दुखी बरे होण्यावर औषधे देण्यात आली. एमआरआयमध्ये संसर्ग आढळला या रुग्णाला जेव्हा औषधांच्या उपचाराचा गुण आला नाही तेव्हा त्याचे एमआरआय स्कॅन करण्यात आले. एमआरआय स्कॅनमध्ये स्पॉन्डिलोडायसिटिस (spondylodiscitis) आजाराचे संक्रमण झाल्याचं दिसून आलं. यामुळे रुग्णाच्या हाडांवर परिणाम झाल्याचं समोर आलं. तज्ज्ञांनी सांगितले की, याला एस्परगिलस ऑस्टियोमायलाईटिस असे म्हटलं जातं. वाचा : Nashik News: Covid लस न देताच CoWin App वर नोंदणी, मालेगावातील 10 शिक्षक निलंबित दीनानाथ मंगशेकर रुग्णालयाचे संसर्गजन्य रोग तज्ञ परिक्षित प्रयाग यांनी सांगितले टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले की, वैद्यकीय भाषेत या आजाराला एस्परगिलस ऑस्टियोमायलाईटिस असे म्हणतात. या बुरशीजन्य संसर्गाचे निदान खरणे खूप कठीण आहे. कारण हे पाठीच्य कण्यातील पोकळीत आढळून येतो. या प्रकारचा बुरशीजन्य संसर्ग कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांच्या तोंडात आढळतो. फुप्फुसातही बुरशी सापडण्याचे हे अत्यंत दुर्मिळ प्रकरण आहे. यापूर्वी असे रुग्ण आढळले नाहीत डॉक्टरांनी सांगितले की, तीन महिन्यात अशा प्रकारचे चार रुग्ण आढळले आहेत. या चार रुग्णांमध्ये एस्परगिलस बुरशीजन्य ऑस्टियोमायलाईटिसचे निदान झाले आहे. यापूर्वी भारतातील कोविडमुक्त झालेल्या रुग्णांमध्ये अशा प्रकारचा कुठलाही आजार नोंदवला गेला नव्हता. वाचा : कोरोना लशीचा ब्लू प्रिंट चोरण्यासाठी या देशाने पाठवला होता गुप्तहेर; खुलाशानंतर उडाली खळबळ चारही रुग्णांवर उपचार सुरू ऑस्टियोमायलाईटिसचा पहिला रुग्ण तीन महिन्यांपूर्वी आढळून आला होता. त्यानंतर आतापर्यंत एकूण चार रुग्ण आढळून आले आहेत. या चारही रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यातील कोरोनाची स्थिती 12 ऑक्टोबर 2021 च्या आकडेवारीनुसार, मंगळवारी पुन्यात 115 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 169 जणांनी कोरोनावर मात केली. तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे पुण्यात आतापर्यंत 9056 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्यस्थितीत पुण्यात 1291 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यापैकी 186 रुग्णांची स्थिती गंभीर आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Coronavirus, Pune

    पुढील बातम्या