मालेगाव, 12 ऑक्टोबर : लस न देता CoWin App वर लसीकरण (Vaccination) करण्यात आल्याचे दाखविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार मालेगावात (Malegaon) समोर आला आहे. या प्रकरणी प्राथमिक शाळेतील 10 शिक्षकांना निलंबित (10 teachers suspended) करण्यात आले आहे. 2 जुलै रोजी हा प्रकार घडला असून तब्बल 3 महिन्यांनंतर तपासणीत एक व्हायल शिल्लक असल्याचे आढळून आल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला आहे.
मालेगावच्या संगमेश्वर भागातील केंद्रावर 2 जुलै रोजी लसीकरण करण्यात आले होते. या केंद्रावर 1 व्हायल शिल्लक असल्याचे आढळून आले होते. व्हायल शिल्लक कशी राहिली याची तपासणी करण्यात आली असता केंद्रावर कार्यरत असलेल्या 10 शिक्षकांनी 13 लाभार्थ्यांना लस न देताच लस देण्यात आल्याची नोंद केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे कर्त्यव्यात कसूर करून राष्ट्रीय कामात अडथळा आणल्याचा ठपका ठेवून 10 शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे.
या 10 शिक्षकांना शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी एफ. डब्ल्यू चव्हाण यांनी निलंबित करण्यात आल्याचा आदेश काढला आहे. एकाच वेळी 10 शिक्षकांना निलंबित करण्यात आल्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 11 ऑक्टोबर 2021 पासून या शिक्षकंना निलंबित करण्यात आले आहे.
निलंबन रद्द करण्याची मागणी
शाळेच्या 10 शिक्षकांना निलंबित करण्यात आल्याने संपूर्ण नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील सर्वच्या सर्व 10 शिक्षकांचे निलंबन रद्द करण्यात यावे अशी मागणी भारतीय उर्दू शिक्षक संघाने केली आहे. त्या संदर्भात त्यांनी शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांना एक पत्रकही दिलं आहे.
नाशकातील 'या' 3 तालुक्यांत पुन्हा कठोर निर्बंध?
राज्यातील कोरोनाची (Coronavirus) रुग्णसंख्या कमी होत असल्याने शाळा सुरू करण्यात आल्या असून मंदिरे खुली (Temples reopen) करण्यात आली आहेत. मात्र, त्याच दरम्यान अहमदनगर (Ahmednagar) आणि नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक (coronavirus spike in Nashik district) होत असल्याचं दिसून येत आहे. अहमदनगरमधील 60 हून अधिक गावांत लॉकडाऊन लावण्यात आला असताना आता नाशकातून चिंता वाढवणारी बातमी आली आहे. नाशिकमधील तीन तालुक्यांत कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. जर या तालुक्यांत कोरोना बाधितांच्या संख्येत अशीच वाढ सुरू राहिली तर कठोर निर्बंध लावण्याचे संकेत पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिले आहेत.
या तीन तालुक्यांनी वाढवली चिंता
चार दिवसांपूर्वी नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, निफाड, सिन्नर आणि येवला तालुक्यात कोरोना बाधिताांची संख्या वाढली असून चिंता वाढवणारी आकडेवारी आहे. काही ठिकाणचे मार्केट्स सुद्धा आपल्याला बंद करावे लागतील. तशी परिस्थिती येऊ नये यासाठी या तिन्ही तालुक्यांत विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. या तालुक्ंयातील कोरोना पॉझिटिव्हिटी दर जर कमी झाला नाही तर कठोर निर्बंध लावावे लागतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.