मुंबई, 27 एप्रिल : जगभरात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार माजला आहे. महाराष्ट्रातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या देशात सर्वाधिक आहे. कोरोनासाठी सामना करण्यासाठी डॉक्टर, आरोग्य सेवक आणि पोलीस जीवाची बाजी लावून कर्तृव्य बजावत आहे. परंतु, कर्तृव्य बजावणाऱ्या पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.
महाराष्ट्रात आतापर्यंत तब्बल 107 पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात 20 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर आतापर्यंत 2 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 7 पोलिसांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्जही देण्यात आला आहे.
हेही वाचा - पोलिसांचा ताफा सोसायटीत येतो, 15 वर्षांच्या मुलाला घरातून बाहेर काढतात आणि...
लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर ठिकठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली होती. लोकांनी घरातच राहावे, असं आवाहनही सरकारकडून करण्यात आलं होतं. परंतु, तरीही काही महाभाग हे रस्त्यावर फिरताना आढळले. त्यामुळे अशा तरुणांवर पोलिसांनी कारवाईही केली. मात्र, कारवाई करत असताना काही जणांनी पोलिसांवर हल्ला केला. राज्यात आतापर्यंत पोलिसांवर हल्ला करण्याच्या 150 घटना समोर आल्या आहे. या प्रकरणी 482 जणांना अटक करण्यात आली आहे.
दोन पोलिसांचा मृत्यू
दरम्यान, कोरोनाशी लढा देणाऱ्या पोलिसांना कोरोनाची लागण होऊन दोन जणांचा मृत्यू झाला आहे. 25 एप्रिल रोजी मुंबईत कोरोनामुळे पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला. मुंबईत पोलीस दलातील कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना होती. मृत पोलीस कॉन्स्टेबल 57 वर्षांचे असून वाकोला पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते.
हेही वाचा - 'ज्या' महिलेची केली चौकशी तिचा झाला कोरोनाने मृत्यू, पोलीस अधिकारी हादरले आणि...
तर नवी मुंबईत आणखी एका पोलीस हवालदाराचा मृत्यू झाला आहे. नवी मुंबईत पोलीस हवालदाराला कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली होती. 23 एप्रिल रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर नवी मुंबईतील MGM रुग्णालयात उपचार सुरू होते. रविवारी पहाटे 04. 40 च्या सुमारास उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाला.
संपादन - सचिन साळवे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.